Cotton soybean market prices in Maharashtra : आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी बाजारभावांची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पावसाची अनिश्चितता, ढगफुटी, अतिवृष्टी, कधी कडक उन्हामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन शेतातच गळून पडलं, कापसाच्या बोंडांवर रोग पडला, सटोड्यांनी भाव नाही म्हणून संत्रे घेणं बंद केलं, तर आले आणि कोथिंबिरीच्या उत्पादनात चढ-उतार दिसत आहेत. अशा परिस्थितीत आजचे बाजारभाव शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचे ठरत आहेत.Cotton soybean market prices in Maharashtra
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, नाशिक, जळगाव, बुलढाणा, परभणी, अकोला, वाशीम, अमरावती या भागांत मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापसाची शेती केली जाते. तर नाशिक, पुणे, सातारा, सांगली या भागांमध्ये कोथिंबीर व आले हे मोठे पीक आहे. नागपूर अमरावती बेल्टमध्ये संत्र्याची शेती मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच ही पिकं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या कमाईचा कणा आहेत. पण भाव पडले की शेतकरी अक्षरशः हतबल होतो. आजही तसंच झालं आहे
सोयाबीनचे भाव घसरले शेतकरी चिंतेत
गेल्या दोन दिवसांत सोयाबीनच्या प्रक्रिया प्लांट्सनी भाव 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलने कमी केले आहेत. आज बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ₹4000 ते ₹4300 या दरम्यान मिळत आहे.
सोयाबीनवरच मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचा हंगामी खर्च अवलंबून असतो. पण भाव नरमल्याने अनेक शेतकरी म्हणतायत की, उत्पादन खर्चही निघत नाहीय कापूस पांढरं सोनं, पण भाव स्थिर
महाराष्ट्राच्या विदर्भ–मराठवाडा–खानदेश भागात कापूस हे ‘पांढरं सोनं’ म्हटलं जातं. पण आज बाजारात कापसाचे भाव स्थिर दिसत आहेत.
आज कापूस ₹7000 ते ₹7300 प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. राज्यातील बाजारात आल्याचे दर नेहमीप्रमाणे उठाठेव दाखवत आहेत. आज आले गुणवत्तेनुसार ₹3500 ते ₹4000 दराने विकले जात आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आल्याचे पीक कुजले, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या वर्षी संत्रा उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. आज सरासरी संत्रे ₹6000 ते ₹7000 प्रतिक्विंटल,
तर कमी दर्जाचा माल ₹2000 ते ₹4000 दराने विकला गेला. नागपू अमरावतीच्या शेतकऱ्यांना मात्र उत्पादन घटल्याने आर्थिक ताण वाढला आहे. कोथिंबीर मर्यादित आवक, भाव मजबूत राज्यात कोथिंबिरीची आवक मर्यादित असल्याने दर स्थिर–मजबूत दिसत आहेत. आज कोथिंबीर ₹3000 ते ₹5000 प्रतिक्विंटल तर शेकडा कोथिंबीर ₹1200 ते ₹1500 दराने विकली जात आहे.
गेल्या काही महिन्यांतील पावसाचा अतिरेक, कधी दुष्काळासारखी परिस्थिति, रोगराई, बाजारातील घसरण या सगळ्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. हाताला पिक दिलं… पण बाजारानं साथ सोडली अशी व्यथा अनेक जण व्यक्त करताना दिसत आहेत.
हे पण वाचा |राज्यात सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा सोयाबीन बाजार भाव
