काका-काकूंचा भन्नाट डान्स व्हायरल “मेरे कॉलेज की लड़की” वर मंचावर उधळला रोमान्स, लाखो लोक झाले फॅन


Couple Viral Dance : सध्या सोशल मीडियावरती अनेक जण आपला व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये आपल्याला सर्व काही पाहायला मिळतं. कुठलाही इव्हेंट कुठला डान्स. सध्या तरुणाईच नाही तर वयोवृद्ध देखील सोशल मीडिया वरती आलेले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे. ते म्हणतात ना प्रेमाला वयाचे बंधन नसतं, आणि जर मनात जिद्द असेल तर चार लोक काय म्हणतील याची परवा लागत नाही. याचं जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावरती वायरल होत आहे. Couple Viral Dance

एका हळदीच्या कार्यक्रमानिमित्त काका काकूंनी नव्वदच्या दशकातील गाजलेलं मेरे कॉलेज की लडकी, या गाण्यावर असा भन्नाट डान्स केला की, पाहणाऱ्यांचे डोळे दिपले. मॅचिंग ड्रेस, हातात हात घेऊन केलेल्या स्टेप्स आणि चेहऱ्यावरचा तो प्रेमाचा उत्साह पाहून तरुण जोडपं सुद्धा शरमतील.

इंस्टाग्राम वर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये एक काका काकू हळदीच्या स्टेजवर नाचताना दिसत आहेत. गाण्याच्या ठेक्यावर त्यांनी इतक्या बिंदासपणे डान्स केला की सगळ्या पाहुण्यांचे लक्ष त्यांच्यावर लागलं. यामध्ये खास म्हणजे दोघांनी मॅचिंग कपडे घातलेत जे त्यांच्या केमिस्ट्रीला अजून उठाव देत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास ते जाणे बिंदास डान्स पाहून तिथल्या लोकांसोबत ऑनलाईन प्रेक्षक ही फिदा झालेत.

हा व्हिडिओ पाहून एक गोष्ट नक्की जाणवते हे कपल चार लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला आनंदाला प्राधान्य देत आहे. पण अनेकदा वय, समाज आणि परंपरा यांच्या विचार करून लोक आपल्या मनातील आनंद दाबून ठेवतात, पण या काका काकून येतो सगळा बंद मोडला आणि सगळ्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं.

सोशल मीडियावरती देखील हा व्हिडिओ धमाकूळ घालत आहे 21 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे तर दोन लाख काहून अधिक लोकांनी लाईक करून त्याचे कौतुक केले आहे. व्हिडिओ खाली दिलेला आहे लिंक वरती क्लिक करून पहा.

इथे क्लिक करून व्हिडिओ पहा

Leave a Comment

error: Content is protected !!