Crop Insurance: शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामासाठी पिक विमा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या कष्टाचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जाऊ नये यासाठी पिक विमा योजना अत्यंत महत्त्वाचे काम करत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार नाही यासाठी ही योजना राबवली जाते. यावर्षी राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना बंद केली असले तरी शेतकऱ्यांनी काही शुल्क भरून या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्यावेत कारण पिक विमा योजनेचे अंतिम मुदत 31 जुलै 2025 ठेवण्यात आली आहे.
पिक विमा योजनेसाठी फार्मर आयडी महत्त्वाचा
पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा फार्मर आयडी नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनी अजून फार मराठी काढलेला नाही त्यांनी लवकरात लवकर जवळील सीएससी केंद्रात जाऊन आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. फार्मर आयडी असल्याशिवाय पिक विमा योजनेला अर्ज करता येणार नाही.
हे पण वाचा| बँक तुमचे काम करत नाही, टेन्शन घेऊ नका; RBI ने दिली खास सुविधा! अशाप्रकारे करू शकता त्यांची तक्रार..
पिक विमा योजना म्हणजे काय?
पिक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकासाठी एक नैसर्गिक आपत्तीपासून किंवा रोगराई पासून मोठे संरक्षण कवच आहे. पेरणी पासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकावर येणाऱ्या नैसर्गिक संकटाशी झुंज देण्याचे काम पिक विमा योजना करते. शेतकऱ्यांच्या पिकाचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळते. यामध्ये पावसा खंड, कीड व रोगाचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या विविध निकषांचा समावेश असतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यास पिक विमा योजना तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करते.
कोणत्या पिकाचा विमा काढता येणार?
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खालील प्रमुख पिकांचा पिक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.
भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग, कारळे, मूग, कांदा, तीळ, तुर
प्रत्येक पीक आणि जिल्ह्यानुसार विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता यामध्ये फरक असतो. त्यामुळे अर्ध भरताना आपल्या पिकासाठी आणि जिल्ह्यासाठी निश्चित केलेली रक्कम तपासून घेणे महत्त्वाचे आहे.Crop Insurance
अर्ज कसा करावा?
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2025 मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज भरताना तुम्हाला फार्मर आयडी आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचे कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे सोबत ठेवावी लागणार आहेत.
शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेचा लाभ घेण्याची ही संधी सोडू नका या योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच जवळील सीएससी केंद्रात जाऊन फार्मर आयडी काढून घ्या आणि पीक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या पिकाचा पिक विमा काढून घ्या.