DA HIKE News : देशभरात लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न होता आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? आणि तो लागू होईपर्यंत महागाई भत्त्याचं काय? कारण महागाई वाढत चालली आहे, घरखर्च वाढत आहेत, आणि पगारात फारसा फरक पडत नसल्याने कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा मानसिक ताण जाणवत होता. पण आता या सगळ्यावर मोठा दिलासा देणारा अपडेट समोर आला आहे आणि तोही सरकारकडूनच. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाची हसू फुलवेल अशी ही बातमी आहे. DA HIKE News
दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात ज्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली, त्याला 3 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृत मंजुरी दिली. सरकारने तीन सदस्यांची समितीही तयार करून त्यांना शिफारशी तयार करण्यासाठी दीड वर्षांचा (18 महिने) कालावधी दिला आहे. म्हणजे सरळ भाषा सांगायची तर हा आयोग एप्रिल 2027 पर्यंत सरकारकडे अंतिम स्वरूपात सादर होणार आणि त्यानंतर 2027 खेरपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता पक्की धरली जात आहे. पण खरी आनंदाची बातमी ही नाही.
खरा आनंद म्हणजे आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार तीनदा महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. कारण सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 ला संपत असला तरी त्याआधी आणि त्यानंतर आयोग लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना जुन्याच नियमांनुसार हक्काचा DA वाढ दिला जात राहणार आहे.
आजच्या घडीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58% DA दिला जातो. आणि जर पुढील तीन हप्त्यांमध्ये दरवेळी 3% दराने वाढ झाली तर, DA थेट 67% पर्यंत पोहोचेल. म्हणजे घरखर्च, मुलांचे शिक्षण, EMI, आणि दैनंदिन ताण यामधून कर्मचाऱ्यांना खूप मोठा श्वास मिळेल.
काही कर्मचारी म्हणत होते की वेतन आयोग लागू झाल्यावरच DA वाढ कदाचित थांबेल का? पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत सातव्या वेतन आयोगाचा महागाई भत्ता हाच लागू राहणार असून, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिलासा मिळत राहणार आहे.
यातला दुसरा मोठा फायदा म्हणजे, आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासूनची थकबाकी देखील मिळेल. त्यामुळे अनेकांच्या खिशात एक मोठी रक्कम जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचमुळे सध्या कर्मचारी वर्गामध्ये एक वेगळीच ऊर्जा दिसत आहे. बराच काळ थांबलेल्या अपेक्षांना हे अपडेट जणू नवं पंख लावून गेलं आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे वर्षाअखेरीस घरखर्च, मुलांची फी, वैद्यकीय खर्च, आणि घरातील उत्सव या सगळ्यामध्ये अडचणी येत होत्या. पण आता समोर आलेल्या या माहितीनंतर त्यांच्या मनात पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. कारण महिन्याला मिळणारा पगार तसाच असला तरी DA वाढ ही कुटुंबाच्या बजेटला एकदम आधार देणारी असते.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एका बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल, तर दुसरीकडे बाजारपेठेतही चैतन्य येईल. कारण पगारात वाढल्यास खरेदीक्षमता वाढते आणि त्याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होतो.
आता पुढील काही दिवसांत महागाई दर काय राहतो, सरकारचा DA कॅल्क्युलेशन किती टक्के वाढ दाखवतो आणि तीन हप्त्यांमध्ये किती वाढ होते हे चित्र आणखी स्पष्ट होईल. पण आत्तासाठी इतकंच निश्चित की, आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच कर्मचाऱ्यांना सलग तीनदा DA वाढ मिळणार आहे. आणि ही बातमी म्हणजे त्यांच्या दिवसाचा सर्वात मोठा दिलासा.
