Daily Astrology Today | नशिबाच्या दारावर ठोका देणाऱ्या एका अत्यंत दुर्मीळ आणि प्रभावशाली योगाची सुरुवात 3 जुलै 2025 पासून होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि सूर्य या दोन
प्रभावशाली ग्रहांच्या युतीमुळे ‘शतांग योग’ तयार होत असून, यामुळे काही निवडक राशींना जबरदस्त फटका तर काहींना आशीर्वाद लाभणार आहे. पण चांगली बातमी अशी की, या वेळेस कर्क, सिंह आणि मकर राशींवर शनी-सूर्य युतीचा खूपच अनुकूल परिणाम होणार आहे. Daily Astrology Today
3 जुलै रोजी संध्याकाळी 6:40 वाजता शनी आणि सूर्य 100 डिग्री अंतरावर असतील आणि त्यामुळे हा दुर्मीळ योग तयार होईल. सध्या शनी मीन राशीत असून तो 2027 पर्यंत तिथेच राहणार आहे, तर सूर्य सध्या मिथुन राशीत आहे. या योगामुळे काही लोकांच्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल घडणार आहेत.
कर्क राशी Cancer
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ ठरणार आहे. गेले काही महिने ज्या गोष्टी तुमच्या हातात येऊनही अडकत होत्या, त्या आता आपोआप मार्गी लागणार आहेत. व्यवसायात प्रगती, समाजात प्रतिष्ठा, आणि तुमच्या मेहनतीचे फळ आता प्रत्यक्ष दिसू लागेल. मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. काहींना सरकारी लाभ किंवा एखादी सन्मानाची संधी सुद्धा मिळू शकते.
मकर राशी Capricorn
शनी हा मकर राशीचा स्वामी असल्याने हा योग मकर राशीसाठी विशेष फलदायी ठरेल. बिझनेस करणाऱ्यांना नवीन डील्स मिळतील, उत्पन्नाचे मार्ग खुलतील आणि घरात समाधानकारक वातावरण निर्माण होईल. सरकारी नोकरी किंवा महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्यांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य मान्यता आणि यश मिळेल.
सिंह राशी Leo
सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे, आणि याच राशीसाठी हा योग एक प्रकारचा वरदान ठरणार आहे. विशेषतः नोकरदार वर्गाला पदोन्नती, बोनस किंवा वेतनवाढीचे संकेत आहेत. बिझनेस करणाऱ्यांना नवीन क्लायंट्स मिळतील आणि आर्थिक बाजू मजबूत होईल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी फार दिवस वाट पाहत होतात, त्या आता पूर्णत्वास जातील. काहींच्या बाबतीत तर अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता सुद्धा आहे.
Disclaimer: वरील दिलेली माहिती वाचकांसाठी बनवलेले आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही कुठल्याही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.
हे पण वाचा | राशिभविष्य: आज या राशीसाठी शुभ संकेत; होणार आर्थिक फायदा! जाणून घ्या सविस्तर माहिती
1 thought on “तीस वर्षांनी तयार झाला मोठा योग 3 जुलैपासून या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल”