Daily Astrology Today : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्थान, त्याची गती आणि राशीतील बदल आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम घडवतो. त्यातही गुरू ग्रह हा ज्ञान, सौभाग्य, सन्मान आणि सुख-समृद्धीचा कारक मानला जातो. सध्या गुरू मिथुन राशीत आहे, पण १३ ऑगस्टपासून गुरूच्या स्थितीत बदल होणार असून या बदलाचा थेट फायदा तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार आहे. या राशींच्या आयुष्यात पैसा प्रेम आणि भौतिक सुखाचा वर्षाव होईल.Daily Astrology Today
कर्क (Kark Rashi) : गुरूच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होणार आहेत. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल, पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य दोन्ही ठिकाणी समाधान राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल, घरात सुख-शांती वाढेल. मान-सन्मान मिळेल, समाजात तुमचं नाव होईल. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्यांना चांगली यशाची बातमी मिळेल. वैवाहिक जीवन गोड होईल आणि भौतिक सुखांचा आनंद मिळेल.
तूळ (Tula Rashi): तूळ राशीसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येतोय. गुरूच्या राशी बदलामुळे आकस्मिक धनलाभ होईल. कर्जाचा बोजा हलका होईल, नोकरीत कामाचं कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल. घरातील तणाव कमी होईल आणि नातेसंबंधात गोडवा येईल. भाग्याची साथ असल्याने अनेक अडथळे सहज दूर होतील.
सिंह (Singh Rashi) : सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात गुरूच्या कृपेने अनेक सकारात्मक घडामोडी होतील. करिअरमध्ये प्रगती, पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल, भावंडांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. जोडीदाराच्या प्रेमात गोडवा वाढेल. अचानक पैशाचे स्रोत मिळतील, कर्ज फेडण्यात यश येईल. नवीन गोष्टी शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून मदत मिळेल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही व अंधश्रद्धेला दुजारा देत नाही.)
हे पण वाचा | 144 वर्षानंतर तो योग जुळून आला; या राशींचे भविष्य उजळणार