Dream11 News : ऑनलाइन गेमिंग च्या दुनिया मध्ये मोठा भूकंप घडणार आहे. कारण फॅनटीसी स्पोर्ट्स पासून, रमी, पोकर सारख्या पैशावर चालणाऱ्या गेम्स वर पूर्णपणे विराम लावण्याची शक्यता आहे. यामध्ये टीम इंडियाचा प्रमुख स्पॉन्सर असलेला ड्रीम इलेव्हन यालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत प्रमोशन अँड रेगुलेशन ऑनलाइन गेमिंग बिल 2025 पास झालं असून ते कायद्यात रूपांतर झाल्यास सर्व मनी बेस्ड ऑनलाईन गेम्स वर बंदी लागू होईल. Dream11 News
सरकारचं म्हणणं आहे की ऑनलाईन गेमिंग मुळे अनेक जण मानसिक, आर्थिक संकटात सापडले आहेत. काही प्रकरण गंभीर होतं की लोकांनी आत्महत्या करण्यापर्यंत पाऊल उचलल. शिवाय मनी लॉन्ड्री आणि नॅशनल सिक्युरिटी संदर्भात ही गंभीर प्रश्न झाले आहेत. त्यामुळे कठोर पावले उचलले जाणार आहेत.
बिलात नेमकं काय आहे?
रियल मनी गेम्स वर बंदी : पैशावर आधारित कोणतही गेम चालवणं, ऑफर करणे किंवा त्याचा प्रचार करणे बेकायदेशीर मानलं जाईल. मात्र खेळणाऱ्यांना शिक्षा होणार नाही.
जेल आणि दंडाची तरतूद : अशा गेम्स ऑफर करणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जाहिरात करणाऱ्यांना दोन वर्ष तुरुंगवासाने 50 लाख रुपयांचा दंड लागू शकतो.
नवीन रेग्युलेटर ऑथॉरिटी: गेमिंग इंडस्ट्रीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधीकरण स्थापन होणार आहे. हे प्राधीकरण कोणत्या गेम रियल मनी गेम आहे ते ठरवलं.
E-Sport चालना: pubg, Free Fire सारख्या टूर्नामेंट्स गेम्स ज्यामध्ये पैसे गुंतवत नाहीत प्रोत्साहन दिल जाईल.
भारताची ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री सध्या तब्बल 32 कोटी रुपयांची आहे. त्यातील 86% महसूल हा मनी बेस्ड गेम्स मधून येतो. पुढील चार वर्षात ही इंडस्ट्री 80 कोटींवर पोहोचेल अशी अपेक्षा होती. पण या बंदीमुळे ड्रीम इलेव्हन गेम्स 27X7, विंजो, गेम्स क्राफ्ट सारख्या कंपन्या मोठ्या अडचणीत येऊ शकतात. या क्षेत्रात तब्बल दोन लाख नोकऱ्या धोक्यात येते, अस्व तज्ञांचे म्हणणं आहे.
ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (AIGF), इगिमिंग फेडरेशन, आणि फेडरेशन ऑफ इंडियन फॅटसी स्पोर्ट या संघटनांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की बंदी ऐवजी योग्य नियम हवं. अन्यथा लोक बेकायदेशीर किंवा विदेशी साइट्स कडे वळतील, ज्यावर ना कर भरला जातो ना नियंत्रण असतं.
इंडस्ट्रीतील लोकांचा दावा आहे की हा बॅन संविधानाविरुद्ध ठरू शकतो. कारण कोर्टाने आधीच म्हटल आहे की रमी किंवा फॅन्टीशी स्पोर्ट सारखे स्किल बेस्ड गेम हे जुगार म्हणता येणार नाहीत. त्यामुळे कंपन्या कोर्टाच दार ठोठावतील अशी शक्यता आहे.