Driving Licence Online: तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळवायचे आहे आता पूर्वीपेक्षा खूपच सोपं झाला आहे. ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आता आरटीओ कार्यालयाच्या लांबलचक रांगेत उभा राहण्याची किंवा तिथे जाऊन टेस्ट देण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या फक्त काही मिनिटांमध्ये तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन मिळू शकता. चला तर मग ही संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया सविस्तरपणे जाणून घेऊया. ड्रायव्हिंग लायसन्स हा कोणत्याही वाहन चालकासाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. लर्निंग लायसनशिवाय वाहन चालवणे म्हणजेच सरळ वाहतूक नियमाचे उल्लंघन करणे. ज्यामुळे तुम्हाला मोठा दंड होण्याची शक्यता आहे.
पूर्वी लर्निंग लायसन मिळवणे म्हणजे एक मोठी कसरतच होती. आरटीओ मध्ये जाऊन तासून तास रांगेत उभा राहून टेस्ट द्या आणि मग कधीतरी लायसन मिळेल याची वाट पहा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही प्रक्रिया करण्याची काही गरज नाही. तुम्ही घर बसल्या फक्त काही मिनिटांमध्ये ड्रायव्हिंग लायसन काढू शकतात. Driving Licence Online
हे पण वाचा| पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार; तुमच्या खात्यात जमा होणार का नाही? पहा येथे
ऑनलाइन लर्निंग लायसन कसे काढावे?
- सर्वप्रथम तुम्हाला परिवहन सेवा या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेजवर तुम्हाला apply for learner licence किंवा online test appointment या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
- राज्य निवडल्यानंतर तुम्ही Sarathi parivahan पोर्टल वर जाल तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातून तुम्हाला apply for learner licence हा पर्याय निवडायचा आहे.
- अर्ज भरताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज क्रमांक नोंदवून ठेवण्यास विसरू नका कारण तो तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी लागणार आहे.
हे पण वाचा| या महिलांना मिळणार 2,500 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा…
ऑनलाइन टेस्ट कशी द्यायची?
तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर आता ऑनलाइन टेस्ट देण्याची वेळ आहे. ही टेस्ट देखील तुम्ही घरबसल्या देऊ शकता.
- सर्वप्रथम अर्ज भरल्यानंतर पुन्हा सारथी पोर्टलवर जा.
- यानंतर Online LL test या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा अर्ज क्रमांक आणि कॅप्चर कोड टाका आणि सबमिट करा.
- यानंतर तुम्ही थेट ऑनलाइन पद्धतीने टेस्ट देऊ शकता.
टेस्ट देण्यापूर्वी tutorial for LL Test या पर्यायावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओ पाहू शकता. यामुळे तुम्हाला टेस्ट कशी द्यायची संपूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने तुमची टेस्ट देऊ शकाल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही टेस्ट सुरू करू शकता.
हे पण वाचा| आज पासून राज्यात मान्सूनचा जोर वाढणार; या 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी! जाणून घ्या हवामान अंदाज
ऑनलाइन टेस्ट सेवा सध्या काही राज्यांपूर्ती मर्यादित आहे. तुमच्या राज्यात ही सेवा उपलब्ध नसेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून आरटीओ मध्ये देण्यासाठी जावे लागेल. तरीही यामुळे तुमचा बराच वेळ वाचतो कारण तुम्हाला केवळ टेस्ट देण्यासाठी आरटीओ ऑफिस मध्ये जावे लागेल. ऑनलाइन टेस्ट पास केल्यानंतर तुमचं लर्निंग लायसन्स लगेच डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल तुम्ही ते डाऊनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता.
ड्रायव्हिंग लायसन मिळवण्यासाठी आता आरटीओ मध्ये तासान तास रांगेत उभे पेक्षा घरबसल्या तुम्ही लायसन मिळवू शकता. सरकारच्या या डिजिटल उपक्रमामुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. फक्त काही मिनिटात घरबसल्या ऑनलाईन टेस्ट देऊन तुम्ही तुमचे अधिकृत लायसन्स मिळू शकता ही सुविधा खरच वेळ श्रम आणि अनावश्यक त्रास वाचवण्यासाठी मोलाची ठरत आहे.