सणासुदीच्या दिवसात गोड तेल महागले! जाणून घ्या खाद्यतेलाच्या नवीन किमती..


Edible Oil Price: सध्या आपलीकडे सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. सध्या श्रावण चालू आहे, अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आले आहे. सण म्हटलं की चैतन्य गोडधोड फराळ बनवणे सुरू होते. पण यंदा या आनंदावर महागाईचा अडथळा निर्माण झाला आहे. रक्षाबंधन, महालक्ष्मी पूजन आणि गणेश उत्सव याचे आगमन होतात बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. सणासुदीला आपण जो गोडधोड पदार्थ बनवतो त्या प्रत्येक पदार्थासाठी तेलाची आवश्यकता असते. मात्र आता गोड तेलाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगला चटका बसत आहे.

गेल्या काही दिवसापासून सोयाबीन, पाम, मोहरी, राईस ब्रान अशा अनेक खाद्यतेलांच्या दरामध्ये प्रति किलो चार ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ ही केवळ किचनपूर्ती मर्यादित राहत नाही तर प्रत्येकाच्या जेवणाच्या चवीवर आणि महिन्याच्या बजेटवर त्याचा परिणाम होताना दिसतो. Edible Oil Price

हे पण वाचा| रक्षाबंधनपूर्वी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर

खाद्य तेलाचे दर

खाद्यतेलजुने दर (प्रति किलो)नवीन दर (प्रति किलो)
सोयाबीन तेल136140
राईस ब्रान तेल140144
मोहरी तेल160170
पाम तेल140145
खोबरे तेल450500
सूर्यफूल तेल160160
शेंगदाणा तेल160160
जवस तेल170170

जून महिन्यामध्ये 150 रुपये प्रति किलो असलेले सोयाबीनचे तेल जुलै महिन्यामध्ये 136 पर्यंत घसरले होते. पण ऑगस्ट च्या सुरुवातीला पुन्हा 140 रुपये पर्यंत खाद्यतेलाचे दर गेले आहेत. पाम तेल पाच रुपयांनी मागलं आणि खोबरे तेल थेट पन्नास रुपयांनी वाढून पाचशे रुपये पर्यंत पोहोचले आहे.

आता एखादा सण आला की घरोघरी फराळ, मिठाई, भजी, वडे, नमकीन अशा अनेक तेलकट पदार्थांचा बेत असतो. आणि हे सगळं त्याला शिवाय करणं अशक्य आहे. घरगुती वापर तर आहेच पण हॉटेल, मिठाई दुकान आणि रोडवरच्या भजी वडापाव वाल्यांना देखील दरवाढीचा मोठा फटका बसत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “सणासुदीच्या दिवसात गोड तेल महागले! जाणून घ्या खाद्यतेलाच्या नवीन किमती..”

Leave a Comment

error: Content is protected !!