Edible oil prices: केंद्र सरकारने अशात जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी कमी केली आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती घसरल्या आहेत. पण स्वयंपाकासाठी अति आवश्यक असणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, आशात सर्वसामान्य गृहणींसाठी स्वयंपाक घरात खर्च पुन्हा वाढत आहे. डाळी भाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने नवीन दर जाहीर केले आहेत. जीएसटी शुल्क कपात केली असली तरी बाजारातील वास्तविक दरांनी ग्राहकांना दिलासा दिलेला नाही.
मोहरी आणि सूर्यफूल तेलाच्या किमती वाढल्या (Mustard and sunflower oil prices)
मागील एक वर्षापासून खाद्यतेलाच्या किमतीने चांगलाच वेग धारण केला आहे. खाद्यतेला शिवाय कोणत्याच भाजीला चव लागत नाही. आणि अशाच मोहरीचे तेल जे पूर्वी 140 रुपयांनी मिळत होते ते आता तब्बल 178 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच 27% ची या तेलामध्ये थेट वाढ झाली आहे. सूर्यफूल तेल देखील जवळपास 31 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. पूर्वी एक लिटर सूर्या फुल तेल 122 रुपयाला मिळत होते मात्र आता 160 रुपयावर पोहोचले आहे.
इतर खाद्यतेलाच्या किमती ((Increase in the price of edible oil)
- सोयाबीन तेल: पूर्वी 120 रुपये आता 146 रुपये प्रति लिटर
- पाम तेल: पूर्वी 99 रुपये आता 130 रुपये प्रति लिटर
- सामान्य भाजीपाला तेल: पूर्वी 125 रुपये आता 157 रुपये प्रति लिटर
ग्राहक संघटनेच्या म्हणण्यानुसार या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यच्या जेवणावर होताना दिसत आहे. आधीच गॅस दूध आणि धान्य महाग झाल्याने आता तेलाचे भावही गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक बचत पूर्णपणे गडबडत आहे. भविष्यात तेलाचे दर आणखीन वाढतील की काय? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहे. Edible oil prices
हे पण वाचा| लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी झिरो टक्के व्याज दरावर मिळणार कर्ज? जाणून घ्या सविस्तर
सरकारची शुल्क कपात पण बाजारावर काहीच परिणाम नाही (Updates on edible oil prices)
जीवन आवश्यक वस्तूंची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने सूर्यफूल सोयाबीन आणि पाम तेल वरील सीमा शुल्क 20 टक्क्यावरून दहा टक्के पर्यंत कमी केला आहे. तसेच रिफाइंड आणि तेलातील शुल्कातील फरक वाढवून 19.25% वर नेण्यात आला आहे. सरकारचा उद्देश ग्राहकांना कमी किमतीत तेल मिळून देणे हा असला तरी प्रत्यक्षात बाजारात उलटच होताना दिसत आहे. जीएसटी कपातीनंतर तेलाचे दर कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत.
जून महिन्यात भाजीपाल्याच्या किमती तब्बल 19 टक्क्यांनी घसरल्या मात्र खाद्यतेलाचे दर वाढतच चालले आहेत. त्यामुळे गृहणीच्या बचत वरचा ताण आणखीन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सनसुदीच्या काळामध्ये गोडधोड पदार्थ मोठ्या प्रमाणात केली जातात अशावेळी तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे तेलाची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे तेलाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत आणखीन वाढ केली आहे.
तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि आयात खर्चामुळे दर कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. सरकारने केलेल्या कर कपातीचा फायदा व्यापारी घेत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत तो फायदा पोहोचत नाही. त्यामुळे ग्राहक संघटनांनी यावर कठोर कारवाई करावी. इतर भाज्या स्वस्त झाल्या असल्या तरी तेल महाग असल्यामुळे स्वयंपाकाचे बचत आटोक्यात येत नाही. सरकारचे निर्णय कागदावर चांगले वाटतात मात्र वास्तविक यात काहीच बदल नाही. सणसुदीला गोडधोडीची चव आता ग्राहकांना महागात पडणार आहे.
