इलेक्ट्रिकल स्कूटर घ्यायचा विचार करताय? तर या पाच कंपन्या स्वस्त इलेक्ट्रिकल स्कूटर विकत आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती


Electric scooter : सध्या भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिकल स्कूटरची क्रेझ वाढत चाललेली आहे. कमीत कमी जास्त फीचर्स असलेला पर्याय लोक शोधत आहेत. आधी लोकांना वाटायचं की स्वस्त इलेक्ट्रिस स्कूटर म्हणजे फीचर्स कमी, रेंज कमी आणि कॉलिटी कमी. पण आता चित्र बदलत चाललेला आहे, कारण मोठ्या कंपन्यांनी थेट बजेट फ्रेंडली मॉडेल बाजारात आणलेली आहे. हिरो, टीव्हीएस, बजाज, होंडा आणि ओला इलेक्ट्रिक सारख्या नामांकित ब्रँड्सने परवडणारी मॉडेल्स लॉन्च करून ग्राहकांना एक मोठी भेट दिलेली आहे. जर तुम्ही देखील खरेदी करण्याचा विचार करताय तर जाणून घेऊया कोणत्या स्कूटरमध्ये काय आहे खास त्याची किंमत किती. Electric scooter

हिरो विडा V2X go आणि V2X Plus

हिरो मोटोक्रॉपच्या विडा ब्रँड्सने नुकत्याच V2X go मॉडेल लॉन्च केलेला आहे, आणि याची किंमत ऐकून तुमचे डोळे फिरतील. फक्त 44 हजार 990 (Showroom price). यामध्ये 2.2 किलोव्हॅट ची बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर ती 90 किमी पर्यंत धावते. टॉप स्पीड आहे तब्बल 70 किमी/ता हिरो कडे आणखी एक स्वस्त पर्याय आहे. V 2X Plus किंमत ₹57,990 (Showroom price), 3.4 किलो व्हॅट बॅटरी, 142 किमी रेंज आणि 40 किमी/ता टॉप स्पीड.

ओला S1 Z आणि S1Z +

दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटर. यामध्ये S1 Z STD ची किंमत 59,999 आणि S1 Z+ ची ₹64,999 (x- showroom price). दोन्ही मॉडेल्स सिंगल्स चार्जवर 146 किमी पर्यंत धावतात आणि 70 किमी/ ता टॉप स्पीड देतात. लुक आणि फीचर्स मध्ये ओला नेहमीप्रमाणे स्टायलिश आहे.

TVS iQube 2.2kw

टीव्हीएस च्या iQube 2.2 किलो व्हॅट व्हर्जनची किंमत ₹94,434 (Ex showroom). एकदा चार्जवर 94 किमी धावते, टॉप स्पीड 75 किमी/ ता आणि 4.4 किलो बॅटची पिकप पावर. शहरात वेग, पिकप आणि स्मूथराईड हवी असेल तर हा पर्याय भारी.

होंडा QC1

होंडाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिकल स्कूटर QC1 ची X शोरूम किंमत ₹94,094 आहे. 1.8किलोवट बॅटरी सह 80 किमी रेंज मिळते. टॉप स्पीड थोडा कमी – 50 किमी/ ता, पण शहरातील रोजच्या वापरासाठी मस्त आहे. होंडाची बिल्ड क्वालिटी यामध्ये मोठा प्लस पॉईंट.

बजाज चेतक 3001

बजाज ऑटोची ही स्कूटर भारतीय बाजारात खूप लोकप्रिय आहे. किंमत ₹1.07 लाख एक्स शोरूम 3 किलोवट बॅटरी सह 127 किमी रेंज आणि 63 किमी/ ता टॉप स्पीड. डिझाईन क्लासिक असून टिकाऊ पणा बजाजचा ब्रँड नेहमीच पुढे.

जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिकल स्कुटी घेण्याचा विचार करत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. यापैकी एक पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. जर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर यापैकी एक घेऊ शकता. अशाच बातमीसाठी आम्हाला फॉलो करत चला.

हे पण वाचा | नविन Ola S1 pro Gen 3 इलेक्ट्रिकल स्कूटर लॉन्च जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Leave a Comment

error: Content is protected !!