Electric Tractor Yojana: डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना शेतीचे मशागत करण्यासाठी जास्त खर्च करावा लागत होता. ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने आता एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शेती कामासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तब्बल दीड लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना आर्थिक धैर्य देण्याचे काम सरकारने केले आहे.
मागील काही वर्षापासून डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर होताना दिसत आहे. पेरणी पासून ते काढणे पर्यंतच्या विविध शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर अनिवार्य आहे. परंतु डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ट्रॅक्टर चालवण्याचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. अनेक शेतकऱ्यांच्या हातात डिझेलच्या खर्चामुळे फारसं काही शिल्लक राहत नव्हतं. ज्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी आणि किफायतशीर उपयांची गरज आहे.
दरम्यान या समस्या वर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेती कामाला इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्यास डिझेलच्या तुलनेत खर्चात 60 ते 70 टक्के पर्यंत बचत होऊ शकते. सध्या अनेक भागांमध्ये नागरणीसाठी प्रति एकर 1500 ते 2000 रुपये खर्च येतो. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे हा खर्च कमी होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल हा केवळ आर्थिक दिलासा नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक चांगला बदल आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल. ज्यामुळे हवामान बदलाच्या दृष्टीने देखील हे सकारात्मक पाऊल आहे.
हे पण वाचा| महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट..
शासनाचा मोठा निर्णय..
राज्यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्रीला आणि वापराला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीवर दीड लाख रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च कमी होऊन त्यांचे उत्पन्न वाढवावे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. परिवहन मंत्री प्रतापराव नाईक यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले की, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतीमध्ये एक नवीन क्रांती घडवेल. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणे अधिक परवडणारा आहे आणि ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेती व्यवसायात अधिक उत्पन्न काढू शकतात.
व्याज मुक्त कर्ज आणि अर्थसहाय्य
दरम्यान इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी केवळ अनुदानच नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना व्याज मुक्त कर्ज देखील देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी भांडवलाची अडचण येणार नाही आणि ते सहजपणे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कडे वळू शकतील. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज आणि आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी मदत होणार आहे. Electric Tractor Yojana
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर करून केवळ शेतकऱ्यांचा खर्च वाचणार नाही तर तो त्यांच्या भविष्यातील शेतीचे चित्र बदलणारा ठरू शकतो. कमी ऑपरेटिंग खर्च पर्यावरणाची काळजी आणि शासनाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहन यामुळे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर येत्या काळात शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ट्रॅक्टर येत्या काळात शेतकऱ्यांसाठी मशागतीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे शेती अधिक टिकाऊ आणि फायदेशीर बनेल असे आहे.