Farmers Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा विषय अतिशय महत्त्वाचा बनला आहे. पेरणी पासून ते पिकाची काढणीपर्यंत शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचा आणखीन भर आहेत. दुष्काळ अतिवृष्टी बाजारभावातील चढ-उतार वाढलेल्या उत्पन्नाचा खर्च या सर्व लक्षात घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे जीवन किती कठीण आहे हे समजते. अशा परिस्थितीत महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता स्थापन होऊन तब्बल आठ महिने पूर्ण झाले तरी याबाबत घोष निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. विरोधक सतत या विषयावरून सरकारवर टीका करत आहेत.
दरम्यान याच विषयावर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफी होणार असल्याची संकेत दिले होते. आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोठे विधान केले आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई आणि नैसर्गिक आपत्ती या सर्व गोष्टींना तोंड देत शेतकरी कशीबशी आपली शेती पिकवतात मात्र त्यानंतरही त्याला बाजारात चांगला दर मिळत नाही. एकूण उत्पादनातून शेतीसाठी केलेला खर्च देखील निघत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारकडून कर्जमाफीची आस लावून धरली आहे.
काय म्हणाले संजय राठोड?
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय राठोड बोलताना म्हणाले, त्यांनी स्पष्ट केले की, संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात सरकारकडून राज्य विधिमंडळात चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच याबाबत घोषणा करतील. असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहून न शकल्याबद्दल खेद व्यक्त केला. तसेच हा कृषी सन्मान पुरस्कार नसून नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिसची कमाल स्कीम..! दरमहा थोडी बचत करा आणि मिळवा तब्बल 40 लाख रुपये
चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुचक विधान
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरसकट कर्जमाफी होणार नाही ती फक्त गरज शेतकऱ्यांसाठीच असेल असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की ज्यांनी फार्म हाऊस बंगले उभे केले आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्यांच्या या विधानामुळे खरंच गरीब आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. Farmers Loan Waiver
गेल्या काही दिवसापासून राज्यभरात शेतकऱ्यांच्या वतीने कर्जमाफीचा तीव्र आवाज होताना दिसत आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विविध शहरात मोर्चे काढण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सरकारला जाब विचारला होता. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? यावर सरकारच्या वतीने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती नेमली आहे असं सांगितलं गेलं होतं. या समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेऊ असेही सभागृहात सांगितले होते.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या
दरम्यान बावनकुळे आणि संजय राठोड यांच्या विधानांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेचे किरण दिसू लागले आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहे शेतीसाठी बी बियाणे खते कीटनाशके यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घ्यावे लागत आहे. अशावेळी जर शेतकऱ्याने योग्य वेळी कर्जमाफी जाहीर केली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शेतकरी नवीन पेरणेने आणि उत्साहाने शेती करेल. शेवटी शेतकरी म्हणजेच आपल्या देशाचा मूळ कणा आहे. जर शेतकरी सुखी झाला तर संपूर्ण देश सुखी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे महायुती सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. संजय राठोड यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतील व काय घोषणा करतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच घोषणा करणार?”