Ferfar Nond : सातबारा उताऱ्यावर झालेली चुकीच्या फेरफाराची नोंद दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर

Ferfar Nond: आपल्या गावाकडच्या मातीची शेतीशी आणि जमिनीशी माणसाचं नातं रक्ताचं नातं असल्यासारखा आहे. सातबारा उतारा म्हणजे फक्त एक कागद नसून तो आपल्या पिढ्यानोपिढ्या इतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी याच मातीत कष्ट केले घामगाळा याचा अभिमान जपणारी आपली भारतीय संस्कृती आहे. पण कधी कधी या सातबारावरील चुकीची किंवा खोटी फेरफार नोंद होते. अशावेळी अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. यातून शेतीचा वाद देखील निर्माण होतो. आज आपण या लेखांमध्ये सातबारा उताऱ्यावरील झालेली चुकीच्या फेरफारिची नोंद दुरुस्त करता येते का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्याच्या वादातून गावच्या राजकारणातून किंवा कधी सध्या लेखणीच्या चुकातूनही अशा नोंदी होऊ शकतात. या चुका लक्षात येईपर्यंत अनेकदा दहा पंधरा वर्षाचा कालावधी देखील उलटून जातो. मग प्रश्न उभा राहतो एवढ्या उशिराने हक्क परत मिळवायचा कसा? आपला हक्क आपल्याला परत मिळवता येतो का? Ferfar Nond

फेरफार नोंद म्हणजे काय?

जमिनीच्या मालकीत हक्कामध्ये किंवा नावात बदल झाल्यानंतर तलाठी किंवा सक्षम महसूल अधिकाऱ्याने जे नोंदवहीत बदल केला आहे त्यालाच फेरफार नोंद असे म्हणतात. उदाहरणार्थ—

  • वारस नोंदवणे
  • विक्री खरेदीनंतर नाव बदल
  • हक्क

हे पण वाचा| RBI कडून ग्राहकांना गुड न्यूज! आता हे काम करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही तर लगेच पैसे खात्यात जमा होणार

पण कधी यामध्ये चुकीची नोंद केली जाते. किंवा मालकाचा हक्क काढून टाकला जातो परिणामी पीक कर्ज अनुदान किंवा जमीन विक्री सारख्या व्यवहारांमध्ये मोठी अडचण निर्माण होते.

सामान्यता चुकीच्या फेरपारे विरुद्ध सात ते 90 दिवसाच्या आत अपील करता येते. पण अनेक वेळा गावातल्या व्यवहारात कागदपत्राच्या ओढाताणीमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे लोक ही मुदत चुकवतात. मग वाटतं आता काही होऊ शकत नाही. पण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 150 (6) अनुसार जर तुमच्याकडे योग्य कारण आणि पुरावे असतील तर महसूल अधिकारी मंडल अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जुन्या चुकीच्या फेरपाली नोंदी रद्द करून नवीन अचूक नोंद करता येते.

  • यासाठी एका वकिलाच्या मार्फत अर्ज करावा लागेल.
  • अधिकारी तुमची कारण तपासून सत्यता आढळल्यास नोंद दुरुस्त करतात.

कलम 251— खोटी ओळख वापरणाऱ्या वर कारवाई

जर एखाद्याने जाणीवपूर्वक खोटी ओळख नाव किंवा माहिती वापरून फेरफार नोंदी केल्या असल्या तर त्याच्यावर कलम २५१अंतर्गत कायदेशीर कारवाई करता येते. म्हणजेच हा फक्त नागरी वाद नाही तर फौजदारी गुन्हा देखील ठरतो.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे जमिनीचे कागद कधीही गृहीत धरू नका. सातबारा आठ अ आणि इतर नोंदी वेळोवेळी तपासा. चुकीचा फेरफारीची नोंद कितीही वर्षापूर्वीची असू द्या तरी ती दुरुस्त करता येते. फक्त योग्य पुरावे आणि कायदेशीर पावलं उचलणं गरजेचे असते. शेवटी आपल्या हक्काची जमीन म्हणजे आपल्या पूर्वजनांचे देण आहे. ती चुकीच्या कागदपत्रामुळे गमवू नका वेळ गेली तरी न्याय मिळू शकतो फक्त प्रयत्न सोडू नका.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!