गुंतवणूकदारांसाठी खास ऑफर! 444 दिवसांची विशेष FD बनवणार मालामाल! कोणत्या बँका देतात सर्वाधिक रिटर्न?


Fixed Deposit Scheme: आजकाल शेअर बाजाराती चढ उतार, सोन्या चांदीच्या भावातील अनिश्चितता आणि म्युच्युअल फंडचा धोका अशा अनेक अडचणींमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. अशावेळी कोणती बँक ग्राहकांना सर्वाधिक रिटर्न्स देते हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दरम्यान गुंतवणूकदारांसाठी आकर्षित आणि स्पेशल एफडी योजना राबवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सध्या सर्वात चर्चेत असलेली योजना म्हणजे 444 दिवसाची खास एफडी योजना. या एफ डी मध्ये सामान्य ठेवीदार तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अति जेष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त परतावा दिला जातो. तर जाणून घेऊया कोणत्या बँका किती व्याज देतात आणि एक लाख रुपये गुंतवल्यास किती रक्कम मिळते.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणारी एसबीआय आपल्या ठेवीदारांसाठी विशेष एफडी योजना राबवत आहे. या योजनेचे नाव आहे अमृत वृत्ती योजना, यामध्ये 444 दिवसाची विशेष एफडी योजना खूपच चांगला रिटर्न्स देते.

  • सर्वसामान्य नागरिकांसाठी व्याजदर: 6.60%
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.10%
  • अति ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.20%

जर समजा कोणी एक लाख रुपयाचे गुंतवणूक केली तर 444 दिवसानंतर एकूण एक लाख 8 हजार 288 रुपये रक्कम मिळेल. म्हणजेच जवळपास आठ हजार 288 हजार रुपये निवड नफा मिळेल. Fixed Deposit Scheme

इंडियन बँक

इंडियन बँक ने देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Ind secure product नावाची 444 दिवसाची एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये व्याजदर खालील प्रमाणे दिला जातो.

  • सर्वसामान्य नागरिकांसाठी व्याजदर: 6.70%
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.20%
  • अति ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.45%

हे पण वाचा| बायकोच्या नावावर फक्त ₹1 लाख ठेवले तर 24 महिन्यांनी किती पैसे मिळतील?

जर या बँकेत तुम्ही एक लाख रुपयाची एफडी केली तर 444 दिवसानंतर एक लाख 8 हजार 418 रुपये मिळतील. म्हणजेच निव्वळ नफा जवळपास 8418 रुपये असेल.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा ने देखील आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक square drive deposit scheme नावाची 444 दिवसाची एफडी योजना सुरू केली आहे.

  • सामान्य नागरिकांसाठी व्याजदर: 6.60%
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7.10%
  • अति ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.20%

या बँकेमध्ये जरतुम्ही एक लाख रुपयाची गुंतवणूक केली तर 444 दिवसानंतर एक लाख 8 हजार 288 रुपये होतील. यामध्ये तुमचा निवड नफा 8288 रुपये एवढा असेल.

आयडीबीआय बँक (IDBI BANK)

या बँकेने देखील उत्सव एफडी नावाची 444 दिवसाची योजना सुरू केली आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

  • सामान्य नागरिकांसाठी व्याजदर: 6.70%
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.20%
  • अति ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.35%

या बँकेत जर तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 444 दिवसानंतर एक लाख 8 हजार 418 मिळतील. यामध्ये 8418 हा केवळ तुमचा नफा असेल.

कॅनरा बँक

कॅनरा बँकेची 444 दिवसाची एफडी योजना देखील गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.

  • सामान्य नागरिकांसाठी व्याजदर: 6.50%
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर: 7.00%

या योजनेत जर तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 444 दिवसानंतर जवळपास एक लाख 8159 रुपये होतील. यामध्ये 8159 रुपये हा तुमचा केवळ नफा असेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!