Gold New Price: जर तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमती पुन्हा एकदा बदलल्या आहेत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती. ज्यामुळे एक लाख रुपयांच्या वर गेलेल्या सोन्याची किमती तब्बल 97 हजार रुपये पर्यंत खाली घसरल्या होत्या. पण आज एक जुलै 2025 रोजी या सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यामुळे सोने खरेदी करणे अगोदर सोन्याचे आजचे दर काय आहेत हे वाचणे गरजेचे आहे.
23 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे एक लाख 690 इतकी होती. त्यानंतर 30 जून 2025 रोजी या किमतीमध्ये 97,260 रुपयापर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरीदरांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा एकदा एक जुलै रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. आज 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्या मागे मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. Gold New Price
हे पण वाचा| जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती घसरल्या; जाणून घ्या नवीन गॅस सिलेंडरचे दर
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर एकसारखे आहे.
- 18 कॅरेट सोन्याचा दर 860 रुपयांनी वाढला असून सध्या 73 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
- 22 कॅरेट सोन्याचा दर 1050 रुपयांनी वाढवून 90 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे.
- 24 कॅरेट सोन्याचा दर 1140 रुपयांनी वाढवून 98 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे.
नाशिक लातूर वसई विरार भिवंडी या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर सारखा आहे.
- 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 860 रुपयाची वाढ होऊन 73 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.
- 22 कॅरेट सोन्याचे किमतीमध्ये 1080 रुपयाची वाढ होऊन 90 हजार 230 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे.
- 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 1140 रुपयांनी वाढवून 98,430 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे.
सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आज झालेल्या सोन्याच्या किमतीतील वाढ लक्षात ठेवा आणि योग्य तो निर्णय घ्या. आम्ही दिलेले सोन्याचे दर आणि स्थानिक ज्वेलरच्या सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक असू शकतो. कारण आम्ही दिलेल्या सोन्याच्या दरामध्ये जीएसटी मेकिंग चार्जेस मिळवलेले नसतात. त्यामुळे अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्सची संपर्क साधा.
1 thought on “Gold New Price: 1 जुलैला सोन्याच्या किमतीत मोठा बदल! जाणून घ्या आजच्या 10 ग्राम सोन्याच्या किमती..”