Gold New Price: तणासुदीच्या दिवसात सोनं खरेदी करायचं म्हटलं की प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असतं. रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी सारखे सण नुकतेच पार पडले आहेत. नेहमीच या काळात सोन्याचे दर वाढलेले असतात मात्र यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. सोन्याच्या दरात या काळात सातत्याने घसरण होत असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. दहीहंडीच्या दिवशी सोन्याचे भाव पुन्हा घसरले असून सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी मानले जात आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर
गेल्या काही दिवसापासून 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी दहा तोळे सोने तब्बल 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज एक तोळा 24 कॅरेट सोने 60 रुपयांनी घसरून 101180 रुपये झाले आहे. म्हणजेच दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1011800 रुपये द्यावे लागणार आहेत.
22 कॅरेट सोन्याचा दर
भारतीय बाजारात सर्वात जास्त विकले जाणारे 22 कॅरेट सोने देखील स्वस्त झाले आहे. लग्नकार्य असो किंवा कोणतेही दागिने बनवायचे असो त्यासाठी सर्वात जास्त पसंती असते ती 22 कॅरेट सोन्याला. यामध्ये देखील मोठी घसरण झाली असून आज एक तोळा 22 कॅरेट सोने पन्नास रुपयांनी स्वस्त झाले आहे. 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 92 हजार 750 रुपये द्यावे लागत आहेत. दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तब्बल पाचशे रुपयाचा दिलासा मिळत आहे.
हे पण वाचा| पोस्ट ऑफिस मध्ये बायकोच्या नावाने 1 लाखांची FD करा अन् मिळवा जबरदस्त नफा..
18 कॅरेट सोन्याचे दर
ज्वेलरी उद्योगासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे 18 कॅरेट सोने देखील आज स्वस्त झाला आहे. एक तोळ्यावर 40 रुपयाची घट झाली असून 100 gm चा दर 75 हजार 890 रुपये एवढा आहे. तर दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी तब्बल 400 रुपयांचा फायदा झाला आहे. Gold New Price
चांदीच्या दरात मात्र तेजी
सोन्याचे भाव जरी कमी झाले असले तरी चांदीच्या किमतीत महागाई सुरूच आहे. एक ग्रॅम चांदी 116 रुपयाला असून एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तब्बल एक लाख 16 हजार दोनशे रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजेच चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना वाढीव रक्कम द्यावी लागत आहे.
सध्या सोन्याच्या दरात झालेली घसरण ग्राहकांना दागिने खरेदी करण्यासाठी मोठी संधी निर्माण करत आहे. अनेक जण सोनही केवळ दागिन्याची वस्तू म्हणून नाही तर भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील खरेदी करतात. आशा नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळत आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाल्यामुळे खरेदीची हिच सुवर्णसंधी आहे.
1 thought on “सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेट सोन्याचा नवा दर इथं पाहा”