सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याची किंमत..


Gold New Price Update: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी आज सोन्याचे दर काय आहेत? हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक म्हणजे ही वाढ जास्त मोठी नाही. 24 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅम मागे फक्त 5 रुपयाची वाढ झाली आहे. 1 तोळ्यामागे तुम्हाला 50 रुपये अधिक किंमत मोजावी लागणार आहे.

आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 99,330 रुपये एवढी आहे. जीएसटी सह हे दर 1 लाख रुपयाच्या पुढे जात आहेत. चला तर जाणून घेऊया 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर आज काय आहेत? गेलं काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. यामध्ये सोन्याचे दर कधी खाली येतात तर कधी वर जातात. काल सोन्याचा दर थोडा कमी झाला होता ज्यात 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 130 रुपयाची घट झाली होती. मात्र आज सराफ बाजार उघडतात सोन्याच्या दारात किंचित वाढ पाहायला मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 जुलै 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम मागे 50 रुपयांनी वाढला असून आज 24 कॅरेट सोन्याचा दर 99,330 रुपये एवढा आहे. जर तुम्हाला 10 तोळे सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला 9 लाख 93 हजार 300 रुपये खर्च करावे लागतील. कारण यामागे तुम्हाला 500 रुपये वाढीव रक्कम द्यावी लागेल. 24 कॅरेट सोने गुंतवणुकीतच दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. त्याचबरोबर 22 कॅरेट सोने सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तुम्हीदेखील सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर 24 कॅरेट सोने तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरवू शकतो.

हे पण वाचा| खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार? लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का? तपासा

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा दर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 50 रुपयांनी वाढला असून तो 91,050 रुपये एवढा झाला आहे. 22 कॅरेट 10 तोळे सोने खरेदीकरण्यासाठी 9 लाख 10 हजार 500 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याच्या दरात 40 रुपयांची वाढ झाली असून ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 74 हजार 500 रुपये मोजावे लागतात. 18 कॅरेट 10 तोळे सोने खरेदी करण्यासाठी 7 लाख 45 हजार रुपये द्यावे लागतील. Gold New Price Update

चांदीच्या किमतीत घसरण

सोन्याच्या दरात जरी वाढ झाली असली तरी चांदीच्या किमतीत मात्र मोठी घसरण झाली आहे. आज तुम्हाला 1 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी 114 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्ही 1 किलो चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला 1 लाख 14 हजार रुपये द्यावे लागतील. कालच्या तुलनेत आज 1 किलो चांदीच्या दरात तब्बल 900 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करण्यासाठी आज तुमच्यासाठी योग्य संधी निर्माण झाली आहे.

सोन्याच्या दरामध्ये रोज बदल होत असतो, मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी सध्या सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची आहे किंवा चांदीत गुंतवणूक करायचे असेल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याची किंमत..”

Leave a Comment

error: Content is protected !!