Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोन्याचे भाव म्हणजे भारतीय घरातील अतिशय संवेदनशील विषय. लग्नसराई, दागिने किंवा सुरक्षित गुंतवणूक सोने प्रत्येकाच्या आयुष्याची घट्ट जोडलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आता पुन्हा एकदा वाढ झाल्याचे समोर आले आहे. सलग सातव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी तब्बल 1,06,200 रुपये द्यावे लागत आहेत. सध्या बाजारातून सोने 1,05,140 रुपयावर उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांचा कल सध्या शेअर बाजार ऐवजी सुरक्षित गुंतवणुकीकडे असल्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सोन्याचे दर का वाढत आहे?
जागतिक स्तरावर चालू असलेल्या घडामोडीवर सोन्याचे दर अवलंबून असतात. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, गुंतवणूकदाराचा सोन्याकडे वाढलेला कल, जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे सोन्याची दरवाढ होऊ शकते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड चा दर $3542 प्रति औंस एवढा आहे. तसेच MCX वरील ऑक्टोबर फीचर्स 1,05,850 रुपया पर्यंत पोहोचले आहे. Gold Price Today
हे पण वाचा| नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून 3.15 लाख रुपयांचे अनुदान मिळणार! जाणून घ्या A TO Z माहिती
शहरानुसार सोन्याचे दर
- नवी दिल्ली: 1,05,820 रुपये
- मुंबई: 1,06,000 रुपये
- पुणे: 1,06,000 रुपये
- बेंगळुरू: 1,06,090 रुपये
- कोलकत्ता: 1,05,860 रुपये
- चेन्नई: 1,06,310 रुपये
चांदीच्या किमतीत वाढ
सोन्या सोबत चांदीचे दर देखील कडाडले आहे. सध्या चांदीचा दर 1 लाख 24 हजार 430 रुपये प्रति किलो एवढी झाली आहे.
सोन्याची ही वाट फक्त आकडेवारी नसून सर्वसामान्य माणसाच्या खिशावर थेट परिणाम करत आहे. लग्न समारंभ शनिवार यामध्ये सोने खरेदी करणाऱ्यांना ज्यादा खर्च करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी ही एक विश्वासच माहिती ठरू शकते. जागतिक व निश्चितता आणि रुपयाची घसरण यामुळे सोन्याचे दर ऐतिहासिक पातळीवर चालले आहेत. भविष्यात कोणाच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.