Gold Price Today: जर तुम्हाला देखील सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची ठरू शकते. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर सातत्याने बदलत आहेत. यामध्ये कधी घसरण होते तर कधी वाढ होते. मात्र आज सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणाच्या निमित्त सोने खरेदी केले जाते. नुकताच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन सण आला आहे. यानिमित्त तुम्ही देखील सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरू शकते. कारण आज सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर
आज 24 कॅरेट म्हणजे सर्वात शुद्ध मानले जाणारे सोने तब्बल 110 रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढले आहे. त्यामुळे आता दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 102330 रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजेच जर तुम्ही दहा तोळे सोने खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला तब्बल 10 लाख 23 हजार 300 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर त्यावर लागणारे इतर कर म्हणजे जीएसटी आणि मेकिंग चार्जेस वेगळेच असतील.
22 कॅरेट सोन्याचा दर
आपल्या भागात सर्वात जास्त विकले जाणारे 22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. आज या सोन्याच्या किमतीमध्ये प्रति तोळा 1000 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आज 22 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. जर तुम्हाला दहा तोळे बावीस कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तब्बल नऊ लाख 38 हजार रुपये द्यावे लागतील.
हे पण वाचा| महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवसापासून राज्यात होणार जोरदार पाऊस; बघा काय म्हटले पंजाबराव?
18 कॅरेट सोन्याचा दर
जर तुम्ही डिझाईनदार दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 18 कॅरेट सोन्याचा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 800 रुपये प्रति दहा ग्रॅम वाढ झाली आहे. त्यामुळे 28 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 76750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. Gold Price Today
चांदीच्या दरही वाढले
सोन्यासोबत आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. एक ग्राम चांदीचा दर एक रुपयांनी वाढला असून तो आता 116 रुपये झाला आहे. त्यामुळे एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी आता एक लाख 16 हजार रुपये द्यावे लागतील जे कालच्या तुलनेत एक हजार रुपयांनी जास्त आहे.
सध्या जागतिक बाजारात होणाऱ्या घडामोडीमुळे आणि डॉलरची होणारी घसरण पाहून सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे ओढ घेत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतामध्ये सणासुदीचे वातावरण असल्यामुळे सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. जर तुम्हाला लग्नासाठी किंवा इतर कोणत्या खास कार्यक्रमासाठी सोने खरेदी करायचे असेल तर दर कमी होतील याची वाट पाहू नका. कारण दर पुन्हा वाढतच जाऊ शकतात याचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. आणि जर गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल तर आणखीन काही काळ थांबलेलं फायद्याचे ठरू शकते.
Disclaimer: वरील दिलेले सोन्याचे दर इंटरनेटवरून माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी टीडीएस आणि मेकिंग चार्जेस मिळवलेले नसतात. प्रत्येक शहरानुसार सोन्याचे दर बदलतात त्यामुळे तुमच्या स्थानिक ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये जाऊन अचूक दूर घ्या.
1 thought on “Gold Price Today: रक्षाबंधनपूर्वी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर”