Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज 30 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत घट दिसून येत होती. मात्र आज अचानक पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये 660 रुपयाची वाढ झाली आहे. ज्यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा एक लाख रुपयांच्या वर पोहोचले आहेत. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर घसरत होती. 23 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 2330 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे होते. त्यानंतर 24 जुलै रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा गट झाली आणि काल 29 जुलै रोजी सोन्याची किंमत 99820 रुपयापर्यंत घसरली होती. मात्र आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्यामुळे सोन्याचे दर एक लाख रुपयांच्या पुढे गेले आहेत.
शहरानुसार आजचे सोन्याचे दर
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये आज खालील प्रमाणे 24 कॅरेट 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर आहेत.
- 24 कॅरेट: 1 लाख 480 रुपये प्रति दहा ग्रॅम
- 22 कॅरेट: 92 हजार 100 रुपये प्रति दहा ग्राम
- 18 कॅरेट: 75 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत खालील प्रमाणे आहे.
- 24 कॅरेट: 1 लाख 510 रुपये प्रति दहा ग्रॅम
- 22 कॅरेट: 92 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम
- 18 कॅरेट: 75 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम
हे पण वाचा| पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार 2,000 रुपये?
चांदीच्या किमतीत देखील वाढ
सोन्याच्या किमती सोबतच चांदीच्या किमतीत देखील आज वाढ झाली आहे. आज चांदीची किंमत प्रति किलोमागे एक हजार रुपयाने वाढली आहे. 23 जुलै रोजी चांदीची किंमत एक लाख 19 हजार रुपये प्रति किलो एवढी होती, त्यानंतर त्यात तीन हजार रुपयाची मोठी घसरण झाली होती. काल 29 जुलै रोजी चांदी एक लाख 16 हजार रुपये प्रति किलो एवढी होती. आजच्या वाढीमुळे चांदीची किंमत एक लाख 17 हजार रुपये प्रति किलो एवढी झाली आहे.
एकंदरीत जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तुम्ही देखील सोन्या चांदी खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आज सोन्याच्या किमतीत झालेली वाढ तुमच्या खिशावर मोठा परिणाम करू शकते. ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. Gold Price Today

1 thought on “सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?”