Gold Price Today: आज 2 जुलै रोजी भारतीय सोन्याच्या बाजारामध्ये सोने चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये प्रति दहा ग्रॅम मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 98410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा 90210 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 73,810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
कालच्या तुलनेत आज 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. काल एक जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 95 हजार 830 रुपये एवढा होता. कालच्या तुलनेत आज दहा ग्रॅम मागे 2520 रुपयाची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर काल 89140 रुपये होता जो आज 90210 रुपये झाला आहे. म्हणजे यामध्ये 1070 ची वाढ झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचा दारात 72 हजार 930 रुपयावरून 73 हजार 810 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. यामध्ये 880 रुपयाची वाढ दिसत आहे.
चांदीचे दर काय आहे?
सोन्याच्या दारासोबत चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज चांदीचा दर प्रति ग्रॅम 110.10 असून प्रति किलोमागे 110100 रुपये मोजावे लागत आहेत. काल चांदीचा दर प्रति ग्रॅम मागे 107.70 रुपये एवढा होता तर प्रत्येक किलोमागे 107700 रुपये एवढा होता. म्हणजेच चांदीचा दर देखील प्रति किलोमागे 2400 रुपयांनी महाग झाला आहे. Gold Price Today
हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण! आतापर्यंत किती पैसे मिळाले? नवीन अर्ज करता येणार का? जाणून घ्या सविस्तर
प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
आज चेन्नई बेंगलोर पुणे मुंबई नागपूर हैदराबाद केरळ आणि कोलकाता यासारख्या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 90210 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 98,410 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
दिल्ली चंदिगड लखनऊ आणि जयपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 90360 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 560 रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. नाशिक मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 90240 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 440 रुपये दर 72 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर सुरत मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 260 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर 98,460 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
वरी दिलेले सोन्याचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी टीडीएस आणि इतर कर मिळवलेले नसतात. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या दरामध्ये आणि स्थानिक ज्वेलर्सच्या सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो अचूक दर जाणून घेण्यासाठी तुमच्या शहरातील स्थानिक ज्वेलर्सची संपर्क साधा.