Gold Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते त्यामुळे अनेक जण खरेदीसाठी चिंताग्रस्त होते. पण आता सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. आज सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 2100 रुपये प्रति 10 तोळे घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हे सुवर्णसंधी ठरू शकते
आजचे सोन्याचे दर
मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात ही घसरण सर्व कॅरेट सोन्याच्या दरासाठी लागू आहे. चला तर मग जाणून घेऊया आज सोने खरेदी करण्यासाठी किती रुपये मोजावे लागत आहेत.
24 कॅरेट सोन्याचा दर
- आज 24 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 99820 रुपये प्रति दहा ग्रॅम द्यावे लागतात. गुरुवारी हाच दर एक लाख तीस रुपये एवढा होता.
- दहा तोळे 24 कॅरेट सोन्याची किंमत 9 लाख 98 हजार दोनशे रुपये एवढी आहे. गुरुवारी हे दर दहा लाख तीनशे रुपये एवढे होते.
हे पण वाचा| फोन पे, गुगल पे वापरताय? मग 1 ऑगस्टपासून UPI व्यवहारावर किती शुल्क द्यावा लागणार? जाणून घ्या सविस्तर
22 कॅरेट सोन्याचा दर
- 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये आज प्रति तोळा दोनशे रुपयाची घट झाली आहे. आज 22 कॅरेट १० ग्राम सोने खरेदी करण्यासाठी 91,500 द्यावे लागत आहेत. गुरुवारी हेच दर 91 हजार 700 रुपये एवढे होते.
- 22 कॅरेट दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी आज नऊ लाख पंधरा हजार रुपये द्यावे लागत आहेत.
18 कॅरेट सोन्याचा दर
18 कॅरेट सोन्याचा दरामध्ये देखील आज मोठी घसरण झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरामागे 160 रुपयाची घसरण झाली आहे. आजचा भाव 74870 रुपये एवढा आहे जो गुरुवारी 75 हजार 30 रुपये एवढा होता. Gold Price Today
चांदीच्या किमतीत घसरण
केवळ सोन्याच्या किमतीत नाही तर चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 2000 रुपयाची मोठी घट झाली आहे. त्यामुळे आज एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी एक लाख 13 हजार रुपये द्यावे लागत आहेत. तुम्ही देखील सोने आणि चांदी खरेदी करू इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
1 thought on “Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, सोन्याचे दर तब्बल 2100 रुपयांनी घसरले; जाणून घ्या आजचा भाव किती?”