Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. रक्षाबंधनानंतर सोन्याच्या बाजारात मोठा उलट फेअर होताना दिसत आहे. मागेल तीन दिवसापासून सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर
गोल्ड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल 880 रुपयांनी घसरला आहे. काल एक तोळा 24 कॅरेट सोनं 1,02,280 रुपयाला विकले जात होते. मात्र आज यामध्ये घसरण होऊन 1,01,400 रुपयाला विकले जात आहे. म्हणजेच दहा तोळे सोने खरेदी करणाऱ्यांना तब्बल आठ हजार आठशे रुपयाचा फायदा होत आहे. आज 24 कॅरेट दहा तोळे सोन्याचा दर 10,14,000 रुपये एवढा आहे. मात्र वरील दिलेले सर्व दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस सारख्या इतर करा रिक्त आहेत. त्यामुळे डायरेक्ट सोने खरेदी करताना स्थानिक ज्वेलरच्या आणि आमच्या सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो.
22 कॅरेट सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याप्रमाणेच 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट सोने प्रति तोळा 800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 22 कॅरेट सोन्याची आजची किंमत 92,950 रुपये प्रतिदहा ग्राम एवढी आहे. काल हाच दर 93750 रुपये एवढा होता. तर दहा तोळे 22 कॅरेट सोने खरेदी करणाऱ्यांचा तब्बल आठ हजार रुपयाचा आज फायदा होत आहे.
हे पण वाचा| सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड वाढ! मात्र शेतकरी नाराज, काय आहे कारण? वाचा सविस्तर
18 कॅरेट सोन्याचे दर
24 आणि 22 कॅरेट प्रमाणेच 18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील 660 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. काल प्रति तोळा 18 कॅरेट सोने 76,710 रुपये एवढे होते. मात्र आज यामध्ये घसरून 76,050 रुपये एवढे झाले आहे. 18 कॅरेट दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी 7,60,500 रुपये द्यावे लागत आहेत.
आजची चांदीचे दर
सोन्याच्या किमती सोबतच चांदीचे दर देखील घसरले आहेत. आज एक ग्राम चांदी दोन रुपयांनी स्वस्त झाले असून तिची किंमत 115 रुपये एवढी झाली आहे. एक किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल दोन हजार रुपयाची घसरण झाली असून आता त्याची किंमत 1,15,000 रुपये प्रति किलो एवढी झाली आहे. Gold Price Today
सोन्याचे दर घसरण्यामागे काय कारण आहे?
अचानक सोन्याच्या किमतीत एवढी घसरण का होते? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे. आमच्या वाचकांसाठी मी सांगू इच्छितो की, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार डॉलर-रुपया विनिमय दरातील बदल, तसेच गुंतवणूकदारांचा कल यामुळे सध्या सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. रक्षाबंधनाचा सण पार पाडल्यानंतर सोन्याची मागणी देखील कमी झाली आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर सोन्याच्या घसरत्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण होत असल्याचे समोर येत आहे.
सध्या सोने खरेदी करावे का नाही?
आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल सध्या सोने खरेदी करावे का आणखीन वाट पाहावी? तर मित्रांनो सध्या सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे आज केलेली सोन्याची खरेदी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. उद्या सोन्याचे किमतीत वाढही होऊ शकते किंवा आणखीनही घसरू शकतात याबद्दल कोणीही ऍक्युरेट माहिती देऊ शकत नाही. मात्र सोने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारात सोन्याचे दर तपासणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक शहरानुसार सोन्याच्या दरामध्ये थोडाफार बदल होत असतो.
1 thought on “सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सोन्याच्या किमतीत ₹8,800 मोठी घसरण; जाणून घ्या 10 तोळे सोन्याचे आजचे दर”