Gold Price Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झालेली वाढ अनेकांच्या खिशावर थेट परिणाम करत होती. पण सण संपताच बाजारामध्ये सोन्याच्या किमतीत मोठा बदल पहायला मिळाला आहे. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याचे दर लग्नाला भिडले असल्यामुळे अनेक जणांनी खरेदी करण्यास टाळाटाळ केली. भाऊ बहिणीच्या या सणासाठी अनेक जण सोने खरेदी करत असतात पण वाढत्या दरामुळे सोने खरेदी न करण्याचा अनेक जणांनी निर्णय घेतला होता. अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरामध्ये तब्बल 7600 ची मोठी घसरण झाली आहे.
9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाचा सण होता. सणानिमित्त अनेकजण सोन्याची खरेदी करत असतात या सणाचे निमित्य साधून अनेक जण सोने खरेदी करण्याचा विचार करत होते. मात्र सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पाहता अनेकांच्या बजेटवर थेट परिणाम झाला मात्र रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 760 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. यामुळे दहा तोळे तब्बल 7600 रुपयांनी घसरले आहे.
आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,02,280 रुपये झाला आहे. त्याचबरोबर आठ ग्रॅम सोन्यासाठी आज 81834 रुपये द्यावे लागत आहे. सोन्याचे दर आज जरी घसरले असले तरी अजूनही एक लाख रुपयाच्या वरच सोन्याचे दर आहेत. त्यामुळे अनेक खरेदीदार आत्ता सोने खरेदी करावे की थांबावे या गोंधळामध्ये आहेत.
हे पण वाचा| आनंदाची बातमी! या 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 3200 कोटी रुपयाचा पिक विमा जमा होणार? जाणून घ्या सविस्तर
22 कॅरेट सोन्याचा दर
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 93 हजार 730 रुपये एवढा आहे. म्हणजेच दहा तोळे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी नऊ लाख 37 हजार पाचशे रुपये द्यावे लागत आहेत. या प्रकारात आज 700 रुपयाची घसरण नोंदवली आहे. आठ ग्रॅम साठी 75 हजार रुपये द्यावे लागत आहेत.
18 कॅरेट सोन्याचा दर
18 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये 570 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. सध्या प्रतीत दहा तोळे 18 कॅरेट सोने 7 लाख 67 हजार 100 रुपये एवढे आहे. आठ ग्रॅम साठी 61,368 रुपये द्यावे लागत आहेत. Gold Price Today
रक्षाबंधनाच्या दिवसाचा भाव पाहिला तर अनेक जणांना आज सोने खरेदी केलेले फायद्याचे ठरू शकते. मात्र दर लाखाच्या आसपास असल्यामुळे अजूनही सावधानगिरी बाळगणारे ग्राहक मोठ्या संख्येत आहेत. तज्ञांच्या मते जागतिक बाजारातील चढ-उतार डॉलरचा दर आणि आयताचा खर्च या सर्व घटकावर पुढील काही दिवसात सोन्याचे दर अवलंबून राहणार आहेत. सोन्याला केवळ दागिना म्हणून परिधान केला जात नाही तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिलं जातं. मात्र गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ साधने खूप महत्त्वाचे ठरते. तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर सोन्याचे दररोज दर जाणून घेत जा.