खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी..


Gold Price Today: सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. एक तोळा सोन्याचा दर एक लाखांवर पोहोचल्याने, सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण झाली असून, ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही गोल्डन संधी मानली जात आहे.

सोन्याच्या दरातील घसरण

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत होते, पण आज या वाढीला ब्रेक लागला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर 1,00,370 रुपये इतका नोंदवला गेला आहे, जो कालच्या दरापेक्षा 1,140 रुपयांनी कमी आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा दर 1,01,510 रुपये होता. या घसरणीमुळे सोने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा| महाराष्ट्र बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू, दरवर्षी थेट ₹12,000 खटाखट जमा होणार.. 

10 तोळ्या सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

आजच्या घसरणीनंतर, 10 तोळ्या सोन्यासाठी तुम्हाला 10,03,700 रुपये मोजावे लागतील. कालच्या दराच्या तुलनेत ही 11,400 रुपयांची थेट बचत होत आहे. त्याचबरोबर 8 ग्रॅम सोन्याचा दर 80,296 रुपये असून, यात 912 रुपयांची घट झाली आहे. जर तुम्ही एक ग्रॅम सोने खरेदी केले तर किती रुपये लागतील? तर 1 ग्रॅम सोन्याची किंमत 10,037 रुपये असून, यात 114 रुपयांची घट झाली आहे.

22 कॅरेट सोन्याचे दरही उतरले

केवळ 24 कॅरेटच नाही, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 92,000 रुपये प्रति तोळा इतका आहे, जो कालच्या तुलनेत 1,050 रुपयांनी कमी आहे. 8 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 73,600 रुपये असून, यात 840 रुपयांची घसरण झाली आहे.

हे पण वाचा| पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा; पहा जिल्ह्यांची यादी..

18 कॅरेट सोन्यातही दिलासा

18 कॅरेट सोन्याचे दरही खाली आले आहेत. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 75,280 रुपये प्रति तोळा आहे, ज्यात 860 रुपयांची घट झाली आहे. 8 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 60,224 रुपये असून, यात 688 रुपयांची घट नोंदवली गेली आहे. Gold Price Today

सोन्यातील घसरण म्हणजे खरेदीसाठी सुवर्णसंधी!

सोन्याच्या दरातील ही घसरण, विशेषतः सणासुदीच्या किंवा लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. जेव्हा सोन्याचे दर गगनाला भिडले होते, तेव्हा अनेकांनी सोने खरेदीचा विचार लांबणीवर टाकला होता. परंतु, आजच्या घसरणीमुळे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सोने खरेदी करणे शक्य होणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही, सोन्याचे दर कमी झाल्यावर खरेदी करणे नेहमीच फायदेशीर ठरते.

सोन्याचे दर कधी वाढतील किंवा कधी कमी होतील, हे सांगणे कठीण असते. त्यामुळे, जेव्हा दर खाली येतात, तेव्हा ही संधी साधणे महत्त्वाचे ठरते. आजची घसरण ही तुम्हाला तुमच्या स्वप्नातील दागिने खरेदी करण्याची किंवा सुरक्षित गुंतवणूक करण्याची उत्तम संधी देत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

2 thoughts on “खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी..”

Leave a Comment

error: Content is protected !!