Gold Price Today: दसऱ्याचा दिवस म्हणजे शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण लक्ष्मीपूजन करतात आणि नवीन खरेदी करणे देखील शुभ मानतात. आजच्या दिवशी सोनं खरेदी करणे अत्यंत चांगलं मानले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदी केले तर वर्षभर घरात भरभराटी होते असे समजले जाते. त्यामुळे या दिवशी अनेक जण सोन्या-चांदीचे खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. सोन्याच्या दरामध्ये आज मोठी घसरण झाली आहे. चला तर मग नवीन सोन्या चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊया.
24 कॅरेट सोन्याचा दर (24 carat gold rate)
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये तब्बल 550 रुपयाची घसरण झाली आहे. म्हणजेच एक तोळा 24 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1,18,690 रुपये द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर दहा तोळा 24 कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी 11,86,900 रुपये द्यावे लागत आहेत. दसऱ्या सारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर सोन्यात ही घसरण झाल्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उत्सुकता आणि आनंद वाढला आहे.
22 कॅरेट सोन्याची किंमत (22 carat gold price)
सोन्याचे दागिने बनवण्यासाठी बावीस कॅरेट सोन्याचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो. यामुळे या सोन्याची मागणी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत पाचशे रुपयांनी कमी झाली आहे. एक तोळा 22 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 1,08,800 रुपये द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर दहा तोळे 222 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 10,88,000 रुपये द्यावे लागत आहेत. दागिने खरेदी करण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त उत्तम मानला जातो.
हे पण वाचा| महाराष्ट्रासह या 15 राज्यांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा इशारा…
18 कॅरेट सोन्याची किंमत (Price of 18 carat gold)
22 आणि 24 कॅरेट सोन्याप्रमाणेच 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील घसरण झाली आहे. आज 18 कॅरेट एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तब्बल 380 रुपये कमी द्यावे लागत आहेत. त्यामुळे 18 कॅरेट सोन्याची किंमत 89020 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. तर दहा तोळे सोने खरेदी करण्यासाठी 890200 रुपये द्यावे लागत आहेत. Gold Price Today
चांदीची किंमत (Silver price)
दसऱ्यानिमित्त सोने जरी स्वस्त झाले असले तरी चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात वाढ झाली असून एक ग्रॅम चांदीचे दर 153 रुपये एवढे झाले आहेत. जो कालच्या तुलनेत दोन रुपयांनी वाढला आहे. तर आज एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी तब्बल दोन हजार रुपये जास्त द्यावे लागत आहेत. आज एक किलो चांदीची किंमत एक लाख 53 हजार रुपये एवढी आहे.
दसऱ्याच्या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील असते. पण आज दर घसरल्याने ग्राहकांसाठी ही दुहेरी आनंदाची बातमी आहे. लग्नसराई आणि आगामी दिवाळीच्या खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात सोना खरेदी करतात. आज झालेल्या घसरणीमुळे सोने खरेदी करण्यासाठी ही सर्वसामान्य नागरिकांना सुवर्णसंधी आहे. एकूणच दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

1 thought on “दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 10 तोळा सोनं 5,500 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन दर”