Gold Price Today: गुड न्यूज! सोनं झालं तब्बल 3,200 रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे नवीन दर

Gold Price Today: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीनिमित्त सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. सध्या नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रनिमित्त अनेक जण नवीन सोन्याचे दागिने खरेदी करतात. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याची आजची किंमत काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते. मागील काही दिवसापासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत होते, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सोने खरेदी करणे कठीण जात होतं. पण आज सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या किमतीत तब्बल 3200 रुपयाची घट झाली आहे. आज चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हीच खरी सुवर्णसंधी आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर

मिळालेल्या माहितीनुसार आज 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झालेली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

  • 1 तोळा 24 कॅरेट सोने: 1,15,370 रुपये (यामध्ये 320 रुपयाने स्वस्त झाला आहे.)
  • 10 तोळा 24 कॅरेट सोने: 11,53,700 रुपये (यामध्ये 3,200 रुपयांनी सोन स्वस्त झाला आहे.)

म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांचे गर्दी दिसत आहे. Gold Price Today

हे पण वाचा| 1 ऑक्टोबर पासून UPI मध्ये मोठा बदल! भारतातील कोट्यवधी UPI यूजरवर होणार थेट परिणाम

22 कॅरेट सोन्याचा दर

मिळालेले माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्यामुळे या सोन्याला मागणी देखील मोठ्या प्रमाणात असते.

  • 1 तोळा 22 कॅरेट सोने: 1,05,750 रुपये (यामध्ये 300 रुपयाची घसरण झाली आहे.)
  • 10 तोळा 22 कॅरेट सोने: 10,57,500 रुपये (3000 रुपयांनी घसरले आहे.)

18 कॅरेट सोन्याची किंमत

जे हलके दागिने बनवण्यासाठी किंवा कमी किमतीत सोनं खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे 18 कॅरेट सोन्याचे दर खालील प्रमाणे आहेत.

  • 1 तोळा 18 कॅरेट सोने: 86,530 रुपये (240 रुपयांनी घसरले आहे.)
  • 10 तोळा 18 कॅरेट सोने: 8,65,300 रुपये (2400 रुपयांनी घसरले आहे.)

आजचे चांदीचे दर

सोन्याच्या किमती जरी घसरण झाली असली तरी चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

  • 1 ग्राम चांदी: ₹140
  • 1 किलो चांदी: ₹1,40,000

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Gold Price Today: गुड न्यूज! सोनं झालं तब्बल 3,200 रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे नवीन दर”

Leave a Comment

error: Content is protected !!