Gold Price Today: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या दिवसात सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. एखाद्या सणानिमित्त सोने खरेदी करणे ही भारतीय परंपरा आहे. सध्या नवरात्र दसरा आणि दिवाळीचा सण येत आहे अशावेळी अनेक जण सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सोने खरेदी करत असताना जर सोन्याचे दर घसरलेले असतील तर सोनं खरीदरांना नवीन प्रेरणा मिळते. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दारात चढ-उतार होत आहे. दर वाढल्यामुळे अनेकांनी खरेदी करणे टाळले होते. पण आज 18 सप्टेंबर 2025 रोजी सोन्याच्या किमतीत झालेली घसरण पाहता खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर
आज 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर तब्बल 450 रुपयांनी घसरला आहे. आता 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 11,117 रुपये द्यावे लागणार आहेत. तर 1 तोळे सोने खरेदी करण्यासाठी 1 लाख 11 हजार 117 रुपये द्यावे लागत आहेत. मोठ्या खरेदी बाबत बोलायचं झालं तर दहा तोळे सोनं जवळपास 5400 रुपये घसरले आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर
24 कॅरेट प्रमाणेच 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दरात 500 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे 1 तोळे 22 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 1 लाख 01 हजार 900 रुपये द्यावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांसाठी 10 तोळ्याच्या सोन्या मध्ये जवळपास 5000 रुपयाची घसरण झाली आहे. Gold Price Today
हे पण वाचा| महाराष्ट्रात होणार तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
18 कॅरेट सोन्याचा दर
18 कॅरेट सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 18 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 400 रुपयाची घसरण झाली आहे. आता 1 तोळे 18 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना तब्बल 83 हजार 380 रुपये द्यावे लागत आहेत. कालच्या तुलनेत हे दर 4000 रुपयांनी कमी झाले आहेत.
चांदीचे दर देखील घसरले
सोन्या सोबत चांदीचे दर देखील घसरले आहेत. आज एक किलो चांदीचा दर ₹1000 ने घसरला असून, एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी 1 लाख 31 हजार रुपये द्यावे लागत आहेत.
सणासुदीच्या काळामध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. प्रत्येक जण गुंतवणुकीसाठी किंवा पिड्यानो पिढ्या परंपरेने दागिने करण्यासाठी सोने घेत असतात. चांदी सुद्धा दागिने बनवण्यासाठी किंवा पूजेसाठी खरेदी केली जाते. अशावेळी दर घसरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. सणाच्या निमित्त पैशाची बचत होणार आहे. त्यामुळे ज्यांनी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतर खरेदी करू असा विचार केला आहे त्यांच्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो.

1 thought on “खुशखबर! घटस्थापनापूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर”