Gold Price Today: गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण असतो, अनेकजण या सणानिमित्त सोन्याचे दागिने खरेदी करतात. मात्र या आनंदाच्या दिवसात सोन्याच्या भावाने मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा धक्का दिला आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासूनच दररोज किंचित सोन्याचे दर वाढत होते. काल सोन्याच्या किमतीत दहा रुपयाची वाढ झाली होती. मात्र आज झालेली वाट पाहून सोने खरेदी करणाऱ्यांना अक्षरशः घाम फुटेल, कारण आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत तब्बल 1640 रुपयाची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी तब्बल 1,04,950 रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजे जर तुम्ही दहा तोळे सोने खरेदी केले तर कालच्या तुलनेत आज 16400 जास्त द्यावे लागत आहेत. अशाप्रकारे गेल्या चार दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसत आहे. Gold Price Today
24 कॅरेट सोन्याचे दर
- 1 तोळा: 1,04,950 रुपये
- 10 तोळे: 10,49,500 रुपये
- कालच्या तुलनेत आज झालेली वाढ: 16,400 रुपये
22 कॅरेट सोन्याचे दर
- 1 तोळा: 96,200 रुपये
- 10 तोळे: 9,62,000 रुपये
- कालच्या तुलनेत आज झालेली वाढ: 15,000 रुपये
हे पण वाचा| लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता कसा बदलावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
18 कॅरेट सोने
- 1 तोळा: 78,710 रुपये
- 10 तोळे: 7,87,100 रुपये
- कालच्या तुलनेत आज झालेली वाढ: 12,300 रुपये
सोन्याचे दर इतक्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेकांच्या घरगुती बजेटवर ताण वाढला आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणे आवश्यक असते. गणपतीला, नवरात्रीला, दिवाळीला अनेकजण सोन्याचे दागिने खरेदी करत असतात. पण या झपाट्याने सोन्याचे दर वाढत असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. घरगुती खर्च, भाजप फळांचा खर्च, पेट्रोल डिझेलचे वाढते दर या सगळ्याचा बोजा खांद्यावर वाढत चालला आहे. त्यात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे अजूनही अडचणी वाढत चालल्या आहेत.
तज्ज्ञांचा सल्ला
तज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी, डॉलरचे चढ उतार, त्याचबरोबर गुंतवणूक दराची सोन्याकडे वळलेली ओढ यामुळे सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. पुढील काही दिवसात दर आणखीन वाढू शकतात अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. सणाच्या काळात सोने खरेदी करावी का थांबावे हा प्रश्न आता प्रत्येक घरातील नागरिकांवर पडला आहे. सणानिमित्त दागिने खरेदी करणे ही परंपरा जुनी असली तरी सोन्याच्या किमतीत होत असलेली वाट पाहून सर्वांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.