Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; 24, 22 अन् 18 कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव सातत्याने बदलत आहेत. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या बदलांमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. आज प्रति तोळ्या मागे तब्बल 820 रुपयांची वाढ झाली असून, सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. चला तर मग जाणून घेऊया 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याची आजची ताजी किंमत किती आहे?

24 कॅरेट सोन्याचा दर

आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका तोळ्याचा भाव थेट 1,12,150 रुपये इतका झाला आहे. आठ ग्रॅम सोन्याचा दर 89,720 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट दहा तोळ्याची किंमत तब्बल 11,21,500 रुपये इतकी झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हतबल झालेले दिसत आहेत. Gold Rate Today

22 कॅरेट सोन्याचा दर

22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. यामध्ये देखील आज वाढ नोंदवली आहे. आज एक तोळा 22 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 1,02,800 रुपये मोजावे लागत आहेत. आठ ग्रॅमचा दर 82,240 रुपये एवढा आहे. 22 कॅरेट 10 तोळे सोने खरेदी करण्यासाठी तब्बल 10,28,000 रुपये मोजावे लागत आहेत.

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेची E-KYC कशी करावी? कोणती कागदपत्रे लागणार? शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

18 कॅरेट सोन्याचा दर

24 आणि 22 कॅरेट प्रमाणेच 18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. 18 कॅरेट सोन्या मागे 610 रुपयाची वाढ झाली असून आता एक तोळ्याचा दर 84,110 रुपये एवढा झाला आहे. आठ ग्रॅम साठी 67,288 रुपये आणि दहा तोळ्यासाठी तब्बल 8,41,100 रुपये द्यावे लागत आहेत.

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. काही दिवसातच नवरात्र सुरू होणार आहे. त्यानंतर दसरा आणि दिवाळी अशा मोठ्या सणाची सुरुवात होणार आहे. या काळात आपल्या भारतीय परंपरेनुसार सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. सोन्याच्या दरात झालेल्या या झपाटीच्या वाढीमुळे अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सोना आता खरेदी करावे की दर घसऱ्याची वाट पाहावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोन्याचे दर वाढत असल्यामुळे गुंतवणूकदारांना मात्र दिलासा मिळत आहे. कारण सोनेत केलेल्या गुंतवणुकीमुळे त्यांना मोठा परतावा मिळत आहे. सोनं हे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखला जाते. भविष्यात सोन्याचे दर वाढणार का घसरणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; 24, 22 अन् 18 कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!