सोन्याचा भाव धडाधड कोसळला! झटक्यात 5 हजारांची घट, बाजारात खळबळ पुढे अजून कमी होणार का?

Gold Rate Today: सोनं म्हणजे भारतीयांसाठी भावन लग्नघर असो वा सणासुदीचा दिवस, लोक पहिली नजर सोन्याच्या दरावरच टाकतात. दिवाळीच्या आधी एकदम उसळी घेतलेल्या सोन्याने आता मात्र अचानक गडगडायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याची चमक जणू कोणीतरी पुसून घेतल्यासारखी मंदावली आहे आणि बाजारात शेर बाजाराप्रमाणेच खूप अस्थिरता दिसत आहे. सोन्याच्या दरात झालेली तब्बल 5 हजार रुपयांहून अधिक घसरण सामान्य ग्राहकांना आश्चर्यचकित करणारी तर सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सध्या दिलासा देणारी ठरतेय.

खरंतर गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात अमेरिकेची अर्थव्यवस्था, तिथले बदलते दर, फेडरल रिझर्व्हकडून होऊ शकणारी व्याजदर कपात, भारतावरचे काही टॅरिफ कमी होण्याची शक्यता… अशा अनेक गोष्टींनी सोन्याच्या दरावर थेट परिणाम केला आहे. आणि या सर्वाचा मिळून एकच परिणाम सोन्याच्या भावाने घेतलेली मोठी उलटी उडी. Gold Rate Today

भारतातील मल्टि कमोडिटी एक्स्चेंजमध्येही ही घसरण स्पष्ट दिसली. 18 नोव्हेंबरच्या सकाळीच सोन्याचा दर तब्बल 1,719 रुपयांनी कोसळून 1,21,208 रुपयांवर आला. दिवसभर हा उतार अजून वाढला आणि दहा ग्रॅम सोनं 1,21,000 रुपयांपर्यंत खाली घसरलं. बाजार सुरु झाला तेव्हा दर 1,22,121 रुपये होता, आणि मागच्या दिवशी 1,22,927 रुपये. म्हणजे पाहता पाहता जवळपास दोन हजारांची घसरण आणि पुढे तीन दिवसांत एकूण 5,751 रुपयांची घट.

सोन्याचा सर्वकालीन उच्च दर पाहता हा भाव जवळपास 11,294 रुपयांनी कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. इतक्या मोठ्या घसरणीने बाजारात चर्चांना उधाण आलंय सोने अजून कमी होणार का? खरेदीसाठी योग्य वेळ आली का? लग्नाच्या मोसमात दर किती राहतील? अशा प्रश्नांनी लोक चिंतित आहेत. तज्ज्ञ मात्र सांगत आहेत की बाजारातील सध्याची अनिश्चितता आणि जागतिक स्थिती पाहता अजून काही काळ सोन्याचा भाव असाच नरम राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच ग्राहकांसाठी सध्या ही स्थिती फायदेशीर असली तरी गुंतवणूकदारांसाठी थोडी सावधानता आवश्यक आहे.

(सूचना : ही माहिती आर्थिक अंदाज, बाजारातील बदल आणि तज्ज्ञांच्या प्राथमिक वर्तवलेल्या मतांवर आधारित आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हे पण वाचा | सोन्याचे दर जोरदार आपटले, 10 ग्रॅम सोन्याचे नवीन बाजार भाव पहा Gold Price Today

Leave a Comment

error: Content is protected !!