Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत होता आणि यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता की कधी सोने खरेदी करावे. आणि अशातच एकदा पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली परंतु आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. ही वाढ सणासुदीच्या तोंडावरती झाली असल्याने ग्राहकांचे खिशाला चांगलाच मोठा फटका बसणार आहे. नवीन दर काय आहे त्यासाठी हा लेख सविस्तरपणे पहा. Gold Rate Today
काय आहेत आत्ताचे सोन्याचे भाव ?
बाजारातून आलेल्या अपडेट नुसार सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव दहा ग्रॅम नुसार 99,600 रुपये इतका आहे तर यात जीएसटी सह एक लाख 2588 रुपये होतो. तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव दहा ग्राम नुसार 91303 रुपये इतका आहे आणि जीएसटी सह 94 हजार 42 रुपये इतका होतं. आणि एक किलो चांदीचा दर आज एक लाख पंधरा हजार रुपये आहे.
मागच्या आठवड्यामध्ये सुरुवातीला तीन दिवस सोन्याच्या दरात तब्बल आठशे रुपयांपेक्षा जास्त मोठी घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, मात्र दोन दिवसापासून पुन्हा भावामध्ये वाढ झाली असून 600 पेक्षा जास्त भाव वाढलेला आहे. चांदीच्या दरात देखील दोन हजार रुपयांची मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
आगामी गणेशोत्सव आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमी वरती अनेकजण सोने-चांदी खरेदी करण्याचा विचारांमध्ये आहे. मात्र दरवाढीमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. आता खरेदी करावी की अजून थांबावं असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. परंतु सोने खरेदी करण्यापूर्वी बाजार तज्ज्ञांचा आणि आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या आणि वरील दिलेले भाव प्रसारमाध्यमांच्या आधारे आहेत योग्य भाव जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.
हे पण वाचा | सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले नवीन दर लगेच पहा!