Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर


Gold Rate Today: भारतात सोन्याला केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर दागिना म्हणून ओळखले जाते. लग्नसराई असो व एखादा सन उत्सव असो सोन्या शिवाय सगळं अपुर वाटतं. पण या सोन्याचे भाव दररोज बदलत असतात. जागतिक बाजारपेठ, डॉलर ची रुपयासोबत तुलना, आयात शुल्क आणि स्थानिक मागणी यावर सोन्याचे दर अवलंबून असतात. त्यामुळे कधी सोन्याचे भाव वाढतात तर कधी अचानक घसरतात. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत थोडी घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा सोन्याचा दर.

आजचे सोन्याचे ताजे दर

  • 24 कॅरेट सोने:– 1,00,023 रुपये
  • 23 कॅरेट सोने:– 99,622 रुपये
  • 22 कॅरेट सोने:– 91,621 रुपये
  • 18 कॅरेट सोने:– 75,017 रुपये
  • 14 कॅरेट सोने:– 58,514 रुपये
  • चांदीचा बाजारभाव:–1,14,933 रुपये

गेल्या आठवड्यात गुरुवारी सोन्याचा भाव तब्बल चारशे रुपये नि वाढला होता. ऑल इंडिया सराफ असोसिएशनच्या माहितीनुसार 99% शुद्ध सोन्याच्या दर 1,01,020 रुपयावरून 1,01,420 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला होता. मात्र 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान बाजार बंद असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सोमवारपासून भावात थोडीशी घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे दर आणखीन घसरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या आठवड्यात सुवर्ण संधी निर्माण होऊ शकते. Gold Rate Today

हे पण वाचा| बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळते शिष्यवृत्ती! आता शिक्षणासाठी मिळणार ₹5,000 ते ₹1,00,000 पर्यंत मदत..

सोन्याचे दर का बदलतात?

  • डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला तर भारतात सोन्याचे दर महाग होतात.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध मंदी व्याजदरातील बदल यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात. यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि सोन्याचे दर वाढतात.
  • स्थानिक बाजारामध्ये लग्नसराई आणि सण उत्सवाच्या काळात मागणी वाढते त्यामुळे देखील दर महाग होतात.
  • भारत हा सोन्याचा सर्वात मोठा आयकर दाता असल्याने सरकारच्या धोरणाचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो.

महागाईच्या काळात सोनं हा सुरक्षित पर्याय मानला जातो. शेअर बाजारातील जोखीम वाढत असल्यामुळे सामान्य गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतो. मध्यमवर्ती बँक देखील आपला साठा वाढवण्यासाठी सोनं विकत घेतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढते. वाढती मागणी सोन्याचे दर देखील महाग करते. दररोज बदलणाऱ्या या भावामध्ये सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम तयार होतो. मात्र दीर्घकालीन दृष्टीने सोने हे केवळ दागिनेच नव्हे तर बचतीचे आणि गुंतवणुकीचे मजबूत साधन आहे. थोडा भाव वाढला का सल्ला तरी सोन्याची किंमत काळा बरोबर वाढतच चालली आहे त्यामुळे योग्य वेळ साधून खरेदी करणे फायद्याचे ठरते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर”

Leave a Comment

error: Content is protected !!