Gold Rate Today: रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी खास भेटवस्तू देत असतो. यंदाच्या रक्षाबंधनासाठी अनेक भाऊ-बहीण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण सध्या सोन्याचे दर सातत्याने बदलत आहेत. आज देखील सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया आज दहा ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावे लागती?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या ताज्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 452 प्रति दहा ग्रॅम एवढा झाला आहे. म्हणजेच सोन्याने पुन्हा एकदा एक लाख रुपयांच्या वरती झेप घेतली आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी एक लाख 13 हजार 485 रुपये द्यावे लागत आहेत. Gold Rate Today
सोन्याचा प्रकार | सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) |
24 कॅरेट | 1,00,452 रुपये |
23 कॅरेट | 1,00,050 रुपये |
22 कॅरेट | 92,014 रुपये |
18 कॅरेट | 75,339 रुपये |
14 कॅरेट | 58,764 रुपये |
हे पण वाचा| काय सांगता? ह्या बँका देत आहे सर्वाधिक व्याजदर तुम्हाला माहित आहे का?
कालच्या तुलनेत आजचे दर
मिळालेले माहितीनुसार, बुधवारी दिल्ली शहरात सोन्याचा दर दोनशे रुपयांनी वाढून 99 हजार 20 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला. मागील 17 तो 98,820 रुपये एवढा होता. चांदीही पाचशे रुपयांनी वाढले आणि ती एक लाख 12 हजार पाचशे रुपये किलोने विकली जात आहे. म्हणजेच आज बाजारात चांगलीच तेजी दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. मात्र देशांतर्गत बाजारात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याचे किमतीत वाढ झाली आहे. न्यूयॉर्कमधील स्पॉट गोल्ड चा दर $17.51 ने घसरून $3363.35 प्रति औंस झाला आहे. तरी भारतात गुंतवणूकदाराची मागणी वाढल्यामुळे स्थानिक बाजारात सोन्याच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. चांदी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झिरो पॉईंट बारा टक्क्याने घसरले असून ती $37.76 प्रति औंस झाली आहे.
सोन्याचे दर वाढीमागे काय कारणे आहेत?
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, मौल्यवान धातूंमध्ये सध्या वाढती मागणी पाहता सोन्याच्या दरात वाढ होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या टॉरीफ इशारामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे पाहतात. त्यामुळे सोने पुन्हा महाग होत चालले आहे. जर रक्षाबंधनासाठी वहिनी साठी गिफ्ट घ्यायचे असेल तर विचार न करता लवकरात लवकर निर्णय घ्या. कारण सोन्याचे दर आणखीन वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
1 thought on “Gold Rate Today: रक्षाबंधनानिमित्त सोने खरेदीचा विचार असेल तर, जाणून घ्या आजचा ताजा भाव”