Government Schemes: महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ठिबक सिंचन च्या अनुदानासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना कागदपत्राचा भला मोठा बोजा उचलावा लागत होता. अर्ज करताना तब्बल दहा-बारा कागदपत्रे अपलोड करावी लागत होती. पण आता शेतकऱ्यांची ही झंझट संपली आहे. महाडीबीटी पोर्टलवर ठिबक अनुदान अर्जासाठी केवळ सहा कागदपत्राची मागणी केली जाणार आहे. कृषी विभागाकडून जिल्हा स्तरावरून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्राची मागणी करू नये. गेल्या काही वर्षात ठिबक अनुदानाच्या प्रक्रियेमध्ये अनेक चुकीचे प्रकार घडल्यामुळे आता ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आली आहे.
अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागणार
शेतकऱ्यांना या योजनेला अर्ज करताना पूर्वसंमती तीन टप्प्यात कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- शेतकरी ओळख क्रमांक
- हमीपत्र
- सूक्ष्म सिंचन दरपत्रक
हे पण वाचा| आज राज्यातील कांदा बाजार भाव वाढले का घसरले? वाचा सविस्तर
यानंतर दुसऱ्या टप्प्यात ठिबक सिंचन बसवल्यानंतर आणखीन तीन कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- देयक
- सुषमा सिंचन आराखडा
- काम पूर्णत्वाचा दाखला
म्हणजेच या सहा कागदपत्रासह शेतकऱ्यांना ठिबक सिंचन चे अनुदान मिळणार आहे.
या योजनेतील एक महत्त्वाची अट मात्र बदललेली नाही. म्हणजेच अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात मागील सात वर्षात ठिबक अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. ची अट कायम राहणार आहे त्यामुळे नवे लाभार्थी या योजनेसाठी पात्र होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. Government Schemes
शेतकऱ्यांना अर्ज करताना हमीपत्र द्यावे लागणार आहे. यामध्ये मी दिलेली माहिती सर्व खरी असून ती खोटी आढळल्यास भारतीय न्याय साहित्य नुसार माझ्यावर कारवाई केली जाईल असे उल्लेख करण्यात आला आहे. या मजकुरामुळे शेतकरी नाराज आहेत कारण सरकार मदत करायला हवं पण सुरुवातीलाच अविश्वास दाखवला जातोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हमी पत्रातील या कठोर ओळी वगळण्यात याव्या अशी मागणी अनेक संघटनांनी केला होता पण अजून कृषी विभागाने यात कोणताही बदल केला नाही.
1 thought on “शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ठिबक अनुदानासाठी अनावश्यक कागदपत्रांची झंझट संपली”