Heavy Rain Damage Compensation: मागील दोन महिन्यापासून राज्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचे अक्षरशा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कष्टाने उभा केलेले पीक डोळ्यासमोर पाण्यात वाहून जाताना शेतकऱ्याने पाहिलं आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन कापूस मका भाजीपाला ऊस कांदा तूर मूग हळद असे अनेक पिकं पावसाच्या पाण्याखाली वाहून गेले आहेत. हातातल्या मेहनतीचे सोनं एका क्षणात चिखलात नाहीशी झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी घोषणा केली आहे की, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी सरकार उपयोजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. लवकरच नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्याच्या आदेश जारी केले आहे.
कुठे किती झाले नुकसान?
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे.
- एकूण 17 लाख 85 हजार 714 हेक्टर क्षेत्र नुकसान झालं आहे.
- 654 महसूल मंडळामधील शेतकरी संकटात आले आहेत.
- सोयाबीन मका कापूस तूर उडीद मूग भाजीपाला फळ ऊस कांदा बाजरी ज्वारी यासारखे पिकअप पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत.
हे पण वाचा| लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये?
सर्वात जास्त नुकसान झालेले जिल्हे
- नांदेड: 7,28,049 हेक्टर
- यवतमाळ: 3,18,860 हेक्टर
- वाशिम: 2,03,098 हेक्टर
- धाराशिव: 1,57,610 हेक्टर
- अकोला: 1,77,466 हेक्टर
- बुलढाणा: 89,782 हेक्टर
- सोलापूर: 47,266 हेक्टर
ग्रामीण भागातील शेतकरी सांगत आहेत की गेल्यामुळे आता बियाणे आणि खत विकत घेण्यासाठी पैसे शिल्लक राहिले नाहीत. सरकारने जर वेळेत मदत दिली नाही तर येणाऱ्या रब्बी हंगामात शेतकरी धोक्यात सापडू शकतो. अशी चिंता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. Heavy Rain Damage Compensation
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट केले आहे की, काही जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. उर्वरित भागामध्ये पंचनामेचे काम सुरू आहे. लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन पुन्हा पुनर्वसन करण्यास मदत करणे सरकारसाठी महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर राज्य उभा आहे आणि त्यांच्या पिकामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकांना जेवण मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे पुनर्वसन होणे खूप महत्त्वाचे आहे. ही मदत केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांच्या अन्नधान्यासाठी आवश्यक आहे.
