Heavy Rain Damage Compensation: राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक आणि पशुपालक या सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झालं आहे. आपला देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी पूर्णपणे हातबल झाला आहे. पीक आणि शेती पाण्याखाली गेल्यामुळे संपूर्ण कष्ट पाण्यात गेलं आहे. अनेक लोकांच्या घराच्या भिंती देखील वाहून गेल्या आहेत. अनेक पशुपालकांचे जनावरे, शेळ्या, मेंढ्या वाहून गेल्या आहेत. रस्ते व पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावोगावी संपर्क तुटला आहे. पावसाच्या या भीषण परिस्थितीमुळे प्रत्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान अजित पवार बीड दौऱ्यावर आले आहेत. या दौरा त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले की, या संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ज्यांच्या घरात मोठं नुकसान झाला आहे त्यांना आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. 5,000 रुपये रोख आणि त्यासोबत धान्य वाटप सुरू करण्यात येईल. पुराच्या पावसात वाहून गेलेल्या गोष्टीचे भरपाई यामधून जरी होत नसली तरी सर्वसामान्य याचा मोठा हातभार लागणार आहे. उर्वरित नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या संकटाला धैर्याने सामोरे जा, फोन किंवा पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. कोणाच्याही भावना दुखावतील असे वागू नका असे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा| राज्यावर आणखी एक मोठं संकट! हवामान विभागाच्या नवीन इशाऱ्यानं चिंता वाढली; जाणून घ्या सविस्तर
मदतीसाठी शासन सज्ज
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. त्यात मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात मोठा पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या घोषणेने दिलासा मिळाला आहे. अनेक लोकांचे घर उध्वस्त होऊन लोक हतबल झाल्याने लोकांना तातडीच्या मदतीचा हात मिळत असल्यामुळे दिलासा मिळाला आहे. अजूनही अनेक कुटुंब पावसाचा पाण्यातील उध्वस्त घरासमोर बसून आहेत. मात्र शासनाकडून मिळणारी ही मदत त्यांच्यासाठी फक्त आधारच ठरणार आहे.
आज अनेक भागांमध्ये पावसाने शेत जमिनीची वाट लागली आहे. पशु वाहून गेले आहेत सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आशेची किरण वाटत आहे. संकटाच्या या अंधारातही एक दिलासा आहे की शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. खऱ्या अर्थाने सरकारचं बळ हेच लोकांना या नुकसानग्रस्त परिस्थितीतून उभारण्यास मदत करेल असे अजित पवार यांनी सिद्ध केले आहे. Heavy Rain Damage Compensation
