Heavy Rain Damage Compensation Announced: महाराष्ट्रात मे महिन्यापासून अतिवृष्टीचा कहर सुरू आहे. शेतकऱ्यांनी कष्ट करून उभं केलेले पीक डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर मदत जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी तब्बल 2215 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 31.64 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप हंगाम 2025 मधील नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली असून, मदत व पुनर्वसन विभागाकडून सबंधित शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार?
सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खालील प्रमाणे जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे. त्यातील काही ठळक जिल्ह्यांची आकडेवारी खालील प्रमाणे आहे. Heavy Rain Damage Compensation Announced
हिंगोली:—
- नुकसान भरपाई निधी: 231.18 कोटी रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 3.04 लाख
- पाण्याखाली गेलेले क्षेत्र: 2.71 लाख हेक्टर
बीड:—
- नुकसान भरपाई निधी: 56.74 कोटी रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 1.14 लाख
धाराशिव:—
- नुकसान भरपाई निधी: 189.61 कोटी रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 2.34 लाख
लातूर:—
- नुकसान भरपाई निधी: 2.35 कोटी रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 3.80 लाख
नाशिक:—
- नुकसान भरपाई निधी: 3.82 कोटी रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 7108 लाख
हे पण वाचा| राज्यातील या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
धुळे:—
- नुकसान भरपाई निधी: 2 लाख रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 72
नंदुरबार: —
- नुकसान भरपाई निधी: 1 लाख रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 25
जळगाव:—
- नुकसान भरपाई निधी: 9.86 कोटी रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 17332
अहिल्यानगर:—
- नुकसान भरपाई निधी: 6 लाख रुपये
- शेतकऱ्यांची संख्या: 140
शेतकऱ्यांना दिलासा
गेल्या काही महिन्यापासून उभपिक निसर्गामुळे पाण्याखाली गेले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला होता. शेतकऱ्यांच्या डोळ्याचे पाणी पुसण्यासाठी ही मदत जरी अपुरे असली तरी शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला नक्कीच आहे. गावोगावी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे सरकारने दिलेली मदत पुरेशी आहे का? या मदतीतून शेतकरी पुन्हा पुढील हंगामासाठी तयार होऊ शकतात का? असे प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित होत आहेत.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ही मदत दिली असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांनाही झालेल्या नुकसानी प्रमाणे मदत जाहीर केले जाईल. आमचं सरकार शेतकऱ्यांसोबत आहे.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण देशातील शेतकरी दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी होतात. राज्य सरकारने दिलेली ही मदत म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जखमेवर मलम लावण्यापूर्ती आहे. खरा दिला असता तर तेव्हा मिळेल जेव्हा शेतकरी पावसावर अवलंबून न राहता सुरक्षित शेतीतून आपलं भविष्य निर्माण करू शकतील. शेतकऱ्याच्या उत्पन्नाला चांगला बाजार भाव मिळाला तर शेतकरी स्ववलंबी म्हणण्यास वेळ लागणार नाही.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर; फडणवीस सरकारचा निर्णय”