Horoscope : नवरात्री संपताच आकाशात मोठं ग्रहबदलाचं समीकरण तयार होतंय. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्रदेव ९ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश साधा नाही, तर नीच राशीत होत असल्यामुळे त्याचा प्रभाव अनेकांवर दिसून येईल. पण त्याच वेळी काही राशींवर मात्र हा गोचर जणू सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. कारण शुक्र हा ग्रह धन, संपत्ती, सुखसोयी आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यांच्यावर शुक्राची कृपा होईल, त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं बदलताना दिसेल. Horoscope
शुक्राचा हा प्रवास बारा राशींवर वेगवेगळे परिणाम करणार असला तरी तीन राशींसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. नवरात्रीच्या उत्सवानंतर थेट भाग्य खुलवणारा हा काळ सुरू होणार आहे. या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होईल, कुटुंबात आनंदाचे वातावरण फुलून येईल, तर अविवाहितांना लग्नाच्या प्रस्तावांची बरसात होईल.
मिथुन राशी : इच्छा पूर्ण होण्याचा काळ
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा हा गोचर भाग्य खुलवणारा आहे. आतापर्यंत ज्या इच्छा मनात दडलेल्या होत्या त्या पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. मेहनतीला योग्य फळ मिळेल, कुटुंबात आनंद वाढेल आणि वैवाहिक जीवन अधिक गोड होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक विचारांची लाट निर्माण होईल. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत कराल आणि नवे बदल स्वीकारण्याची तयारी दाखवाल. वृषभ राशी : सुखसमृद्धीची बरसात
वृषभ राशीच्या व्यक्तींवर शुक्रदेवाची कृपा राहणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील, नव्या जबाबदाऱ्या हातात येतील आणि त्यातून समाधान मिळेल. वैवाहिक आयुष्यातही गोडी निर्माण होईल. करिअरमध्ये प्रगती, पैशांचा ओघ आणि समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. फक्त या काळात मेहनत सोडू नका, कारण मेहनतच तुम्हाला मोठं फळ देईल.
सिंह राशी: करिअर व वैवाहिक जीवनासाठी अनुकूल काळ
सिंह राशीच्या लोकांसाठी हा गोचर अगदी सोनेरी ठरणार आहे. करिअरमध्ये उत्तम प्रगती होईल, व्यवसायात नवे मार्ग खुलतील. भाग्याची साथ लाभेल आणि अनेक आनंदी वार्ता कानावर पडतील. मुलांकडून सुखद बातम्या मिळतील, तर अविवाहितांना विवाहासाठी प्रस्ताव येऊन आनंद दुणावेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाची गोडी चाखायला मिळेल. या काळात तुमचं आयुष्य एका नव्या वळणावर पोहोचेल.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)