Horoscope Signs | ग्रह-ताऱ्यांचा खेळ कधी कोणाच्या आयुष्याला नवं वळण देईल हे सांगता येत नाही. एकाच वेळी दोन शक्तिशाली ग्रह जर एकत्र आले, तर त्या संयोगाचा परिणाम नेहमीच खास असतो. असाच एक दुर्मिळ क्षण १२ महिन्यांनंतर येतोय. सप्टेंबर २०२५ मध्ये सूर्य आणि शुक्र यांची महायुती तूळ राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग काही राशींसाठी भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. कुणाला पद-प्रतिष्ठा, कुणाला आर्थिक लाभ तर कुणाला मनासारखा जीवनसाथी मिळण्याची संधी मिळणार आहे. Horoscope Signs
सूर्य म्हणजे तेज मान-सन्मान आणि अधिकार. तर शुक्र म्हणजे वैभव, संपत्ती आणि प्रेमाचं प्रतीक. हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आयुष्यात नवा बदल घडतो. यावेळी या महायोगाचा लाभ तूळ, धनु आणि मकर राशीच्या लोकांना विशेष मिळणार असल्याचं ज्योतिष सांगतं.
तूळ राशी(Libra) : लग्नाचे प्रस्ताव आणि प्रतिष्ठेची वाढ
तूळ राशीतच ही युती होणार असल्याने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल. आतापर्यंत अडकलेली कामं वेगाने मार्गी लागतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. ज्यांना बऱ्याच काळापासून योग्य जोडीदार मिळत नव्हता, त्यांच्याकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातले ताणतणाव कमी होतील, नातेसंबंधात गोडवा येईल. व्यापारी वर्गाला नवे भागीदार मिळतील आणि व्यवसायात मोठा फायदा होईल
धनु राशी(Sagittarius) : पैशाची आवक आणि नवा साथीदार
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील, नफ्यात वाढ होईल. जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतील. एकट्या असणाऱ्यांना कुटुंबीय कार्यक्रमांत त्यांच्या जीवनसाथीची भेट होऊ शकते. विवाहितांना मानसिक शांती आणि नात्यांमध्ये स्थिरता लाभेल. नोकरीत सहकाऱ्यांशी चांगला समन्वय राहील. शेअर बाजार, लॉटरी किंवा गुंतवणुकीतही हात वर होऊ शकतो.
मकर राशी(Capricorn) : पदोन्नती आणि व्यवसायात वाढ
मकर राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. कर्मभावात होणारी ही युती पदोन्नतीचा मार्ग मोकळा करू शकते. व्यवसायात आर्थिक फायदा, नवे भागीदार आणि विस्ताराचे संधी मिळतील. नोकरदारांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतील.
(DISCLAIMER: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही).