Horoscope Today Astrology |ज्योतिषप्रेमींनो, जुलै महिना काही राशींना सावधगिरीचा इशारा देतोय. कारण १ जुलैपासून सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती होऊन ‘अंगारक योग’ निर्माण होत आहे. हा योग २८ जुलैपर्यंत प्रभावी राहणार असून, काही राशींवर त्याचा फारसा अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. या कालावधीत राग, तणाव, अपघात, धनहानी, आरोग्याच्या तक्रारी या गोष्टी विशेषतः त्रासदायक ठरू शकतात. म्हणून काही राशींनी विशेष सतर्क राहणं गरजेचं आहे. Horoscope Today Astrology
कोणत्या राशींवर परिणाम होणार?
या अंगारक योगाचा प्रभाव मुख्यतः सिंह, वृश्चिक आणि मकर राशींवर होणार आहे. चला पाहूया याचा परिणाम नेमका कसा होऊ शकतो…
सिंह राशी (Leo)
सिंह राशीतच मंगळ व केतू विराजमान असल्याने या राशीतील लोकांच्याच लग्न भावात हा योग तयार होतो. त्यामुळे स्वभाव चिडचिडा, रागीट होण्याची शक्यता जास्त आहे. या काळात कोणत्याही गोष्टीवर उगाचच प्रतिक्रिया देणं, रागाच्या भरात तडकाफडकी निर्णय घेणं टाळा. विशेषतः वैवाहिक जीवनात तणाव होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी वाद वाढू शकतो. नवीन गुंतवणूक, भागीदारीचं काम सुरू करणं, यासाठीही वेळ योग्य नाही. जेवढं शांत राहाल, तेवढं त्रास कमी होईल.
वृश्चिक राशी (Scorpio)
वृश्चिक राशीसाठी हा योग कर्म भावात तयार होत आहे. म्हणजेच कार्यक्षेत्रात अडथळे, सहकाऱ्यांशी मतभेद, वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. संयम आणि शांततेने काम केल्यास नातेसंबंध बिघडणार नाहीत. ज्यांना नवीन नोकरीचा विचार सुरू आहे त्यांनी जरा थांबावं. एवढंच नाही तर, वाहन चालवताना खबरदारी घ्या. अपघाताचे योग या काळात विशेष सक्रिय आहेत. गर्भवती महिलांनी या काळात जास्त काळजी घ्यावी प्रवास, थकवा आणि मानसिक ताण टाळावा.
हे पण वाचा | Rashi Bhavishya: या तीन राशींचे भाग्य उजळणार! तयार झाला मोठा राज योग, कोणत्या आहे या राशी
मकर राशी (Capricorn)
मकर राशीसाठी अंगारक योग अष्टम भावात तयार होतोय. या भावाचा संबंध आरोग्य, अचानक नुकसान, मनःशांती आणि आयुष्याच्या अनिश्चिततेशी असतो. त्यामुळे काहीजणांना जुने आजार परत त्रास देऊ शकतात विशेषतः मानसिक तणाव, डोकेदुखी, पचन बिघाड, थकवा इत्यादी. या काळात अचानक पैशाची गरज भासणं, किंवा पैसे अडकणं असं काही अनुभवाला येऊ शकतं. जोडीदारासोबत गैरसमज, नाराजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद शांत आणि समजूतदारपणे करा.
(Disclaimer | वरील दिलेली माहिती ही वाचकांसाठी बनवलेली आहे. याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)