HSRP Number Plate: महत्त्वाची बातमी! 15 ऑगस्टपूर्वी हे काम करा, अन्यथा लागेल ₹10,000 दंड


HSRP Number Plate: वाहनधारकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही गावात शहरात किंवा हायवेवर कुठेही गाडी चालवत असाल तर तिचा नंबर एकदम पोस्ट आणि सुरक्षित असावा हे आता सरकारने ठरवले आहे. यालाच म्हणतात HSRP नंबर प्लेट—हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही फक्त कागदोपत्री नियम नाही तर तुमच्या गाडीची ओळख सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या गाडीला अजूनही ही नंबर प्लेट बसवलेली नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला तब्बल दहा हजाराचा दंड लागू शकतो.

यासाठी सरकारने दिलेली शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे. या तारखेच्या आत जर तुम्ही तुमची नंबर प्लेट HSRP बनवली नाही, तर तुम्हाला सरकारकडून दहा हजार रुपयांचा दंड लागू शकतो. आजच्या तारखेनुसार तुमच्या हातात आता शेवटची तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. या तारखेनंतर नियम मोडल्यास दहा हजार रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे. जर तुम्हाला हा दंड टाळवायचा असेल तर काय करावे लागेल? याबद्दल जाणून घेऊया.

जर तुम्हाला हा दंड टाळायचा असेल तर 15 ऑगस्ट पूर्वी तुम्ही HSRP साठी ऑनलाईन नोंदणी केली आणि अपॉइंटमेंट पुढच्या तारखेला मिळाली तर तुम्ही वाचताल. पण नोंदणीच नाही केली आणि नंबर प्लेट ही बसवले नाही तर ट्राफिक पोलीस थांबून पावती फाडून चक्क मोठी रक्कम बळकावली जाऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल HSRP नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय? चला तर मग जाऊन घेऊया याबद्दल देखील सविस्तर माहिती.

हे पण वाचा| तुमच्या मोबाईल वरूनच अशी करा ई-पीक पाहणी! शेतकऱ्यांसाठी A-Z सविस्तर माहिती

2019 नंतरच्या सर्व नव्या गाड्यांना ही प्लेट आधीच बसवली जात आहे. मात्र त्याआधी खरेदी केलेल्या गाड्या असतील तर तुमच्यासाठी हा नियम लागू आहे. यामध्ये कार ट्रक बाईक या गाड्यांचा समावेश आहे. ही प्लेट खास मटेरियल ची बनलेली असते. यामध्ये छेडछाड टाळणारे आणि त्यावर खास लेसर कोड असतो. चोरी बनावट नंबर किंवा गाडी शोधण्यात ही प्लेट अत्यंत मदतीची ठरते. HSRP Number Plate

नोंदणी कशी करावी?

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुमच्या गाडीचा RC नंबर, नोंदणी तपशील भरा.
  • त्यानंतर जवळचे फिटमेंट सेंटर निवडा.
  • शुल्क भरा.
  • मिळालेल्या तारखेला गाडी घेऊन जा आणि प्लेट बसून घ्या.

थोडक्यात 15 ऑगस्ट हा फक्त स्वातंत्र्य दिन नाही तर तुमच्या गाड्यांच्या कायदेशीर स्वातंत्र्याचा दिवसही असू शकतो. वेळ घालवता आजच तुमच्या गाड्याची नंबर प्लेट नोंदणी करून घ्या. कारण एकदा दंडाची पावती हातात पडली की नंतर पश्चातापाशिवाय काहीच शिल्लक राहणार नाही. 15 ऑगस्ट अगोदर तुमच्या गाडीची नंबर प्लेट तयार करून घ्या अन्यथा तब्बल दहा हजार रुपयाचा दंड भरावा लागू शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!