IMD Rain Forecast: महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाची संकट कोसळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा जोर सुरू असून मराठवाडा विदर्भ आणि कोकण या भागात मोठ्या पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेले पीक डोळ्यासमोरून वाहून जाताना दिसत आहे. त्याचबरोबर नदी नाल्यांना आलेला पूर जनजीवन विस्कळीत करत आहे. या पावसामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असून जनावरे पाण्यात वाहून गेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 24 तास महाराष्ट्रातील नागरिकांसाठी धोक्याचे ठरणार आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासात महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आहे.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि पालघर मध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. IMD Rain Forecast
हे पण वाचा| आनंदाची बातमी! नोव्हेंबर महिन्यापासून ‘या’ महिलांना मिळणार दरमहा 2,100 रुपये? कोणाला मिळणार लाभ? पहा येथे
पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा संकट
सातारा पुणे सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोलापूर मध्ये पावसामुळे आधीच खूप नुकसान झाला असलं तरी पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. या भागातील नद्या ओढ्यांना मोठे पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भावर धोक्याचा इशारा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर बीड नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आधीच घाम गाळून कसं बसू उभं केलेलं पीक पावसाने वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. त्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भात तर परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे दिसत आहे. जवळपास सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट देण्यात आले असून, विदर्भात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. अकोला वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रशासन सतर्क झाले असून येथील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावेळी फक्त पाऊसच नाही तर जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सुटणारे वारे अनेक भागात झाडे, विजेचे पोल, घरे विस्कळीत करू शकतात. ग्रामीण भागात या वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांसाठी आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना पुढील 24 तास अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी आवाहन केले आहे. यामध्ये नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी नाले धरणाजवळ जाऊ नये, घराबाहेर उभ्या झाडाखाली उभे राहू नये, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनेचे पालन करावे. महाराष्ट्रात निसर्गाचा हा रौद्र अवतार पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. शेतकऱ्यांनी कावड कष्ट करून उभं केलेले पीक पाण्याखाली गेल्यामुळे त्यांची मोठी आर्थिक नुकसान झाली आहे. सर्वांना आता एकच आशा आहे हा पाऊस केव्हा थांबून पुन्हा सूर्य डोक्यावर येईल.

1 thought on “महाराष्ट्रात होणार तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा”