IMD Weather Forecast | महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल घडण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईपासून ते विदर्भापर्यंत अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. अशातच हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह पुणे घाटमाता मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. IMD Weather Forecast
हवामान विभागाच्या नवीन अपडेट नुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट परिणाम महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे किनारपट्टीसह घाटमाथा भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमी वरती रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे घाटमाथा आणि काही विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुण्यातील घाटमाथा भाग धोक्याचा झोनमध्ये आहे. विदर्भातील जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये देखील कलर पावसाची शक्यता वर्तवली.
5 सप्टेंबर : रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यवर ऑरेंज अलर्ट, तर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर येथे येलो अलर्ट.
6 सप्टेंबर : पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर कोकणासह इतर भागांत येलो अलर्ट.
7 सप्टेंबर : रायगड, रत्नागिरी आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहणार.
गेल्या 24 तासांमध्ये कोकण आणि घाटमाथा परिसरावर मुसळधार पाऊस कोसळला, तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावली. अनेक ठिकाणी ऊन सावलीचा खेळ सुरू असतानाच पावसाच्या सरींनी नागरिकांना दिलासा दिला.
याच दरम्यान, मुसलदार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा साठा तब्बल 93% वर पोहोचला आहे. मध्यम प्रकल्पांचा साठा 77% वर पोहोचला तर लघु प्रकल्पांचा साठा ५७ टक्क्यांवर पोहोचला. मराठवाड्यातील अनेक मोठी मध्यम आणि लहान धरणे भरून वाहू लागली आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धरणात तर 81% हून होणार अधिक पाणीसाठा झाला.
हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे आणि प्रशासनाच्या सूचना जाणून पालन करावे.