IMD Weather Update | गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे. यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळाला परंतु आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे या नवीन अंदाजानुसार राज्यात 29 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी याच पार्श्वभूमी वरती सध्या गणेशोत्सव राज्यामध्ये सुरू आहे त्यामुळे लोकांचे मोठे हाल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. IMD Weather Update
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडणार आहे. मराठवाड्यामध्ये साधारण पाऊस होईल आणि मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे पुढची दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे घराबाहेर पडताना छत्रि शिवाय बाहेर पडणे धोक्याच ठरू शकतात.
एवढेच नाही, तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे अचानक ढग फुटल्यासारखा पाऊस पडू शकतो. हा म्हणे वाघाने सांगितला आहे की बंगालचे उपसागरातून आलेल्या वाऱ्यामुळे मध्य प्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा बदल झालेला आहे. मूळ राज्यात 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे.
27 ते 30 ऑगस्ट दरम्यान मध्ये महाराष्ट्रात हा पाऊस जोरदार पडणार आहे तर 28 ऑगस्टला कोकण गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गुजरात मध्ये देखील अती मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे त्याचा फटका उत्तर महाराष्ट्रात देखील बसू शकतो. पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस पडू शकतो मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वांनी सतर्क राहणं गरजेचे. बाहेर पडताना छत्रीबरोबर ठेवा आणि नदी नाल्यांना पूर आल्यास जवळ जाण टाळावं.
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार! मात्र या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस होणार..