IMD Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील सात दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून तब्बल 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात देशभरात चांगला पाऊस झाला आहे. काही राज्यांमध्ये तर पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठे नुकसान देखील झाले आहे. पंजाब मध्ये तर शेकडो गावे पाण्याखाली वाहून गेले आहेत. आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 11 ते 16 सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात दिल्ली राजस्थानमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर पंजाब हरियाणा येथे मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या भागामध्ये 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे ईशान्य भारतात मेघालय मेझोरम त्रिपुरा नागालँड मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश मध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD Weather Update
हे पण वाचा| खुशखबर! ऑगस्ट महिन्याचे ₹1500 खात्यात खटाखट येणार, सरकारने घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्रात पावसाचा इशारा
हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी मोठा इशारा दिला आहे. 17 सप्टेंबर पर्यंत राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार त्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यामध्ये वादळी वारा, विजेचा कडकडाट सोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी अति आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असा स्पष्ट इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
- नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामान विभागाचा अंदाज लक्षात घ्यावा.
- घराबाहेर पडल्यानंतर नदी नाल्यांच्या काठावर जाऊ नका.
- विजाचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नका.
- शेतकरी मित्रांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
शेती करण्यासाठी पाऊस हा अति आवश्यक आहे. पण त्याच वेळी हाच पाऊस अति प्रमाणात झाला तर शेतकऱ्यांसाठी मोठे संकट देखील बनतो. पाऊस हा नागरिकांसाठी जीव घेणे देखील ठरू शकतो. महाराष्ट्रातील जनतेने सध्या सावध राहणं आवश्यक आहे. निसर्गाच्या या तांडवात आपण सर्वांनी धैर्याने आणि सहसाने सामोरे जावे. गरज असेल तरच घराबाहेर पाडा आणि स्वतः आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वात आधी पहा.