हवामान खात्याचा मोठा इशारा; पुढील 24 तासात या जिल्ह्यात होणार तुफान पाऊस


IMD Weather Update : राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर हा हवामान अंदाज लक्षात घेऊन सावध व्हायचा आहे. कारण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि बंगालचे उपसागरातून येणारे दमट वारे यामुळे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमी वरती कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नवीन हवामान अंदाज जाणून घेऊया. IMD Weather Update

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा शक्यता आहे. तर मुंबईमध्ये सकाळ धरूनच रिमझिम पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो अशी शक्यता आहे.

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाटात आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी आणि खत टाकण्याचं काम पुढे ढकलावे लागू शकते. तसेच हवामान खात्याचा अंदाज देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा| राज्यातील या 23 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा? वाचा सविस्तर माहिती

राज्यातील विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. नदीकाठची लोकांनी सतर्क रहावे पाणी झपाट्याने वाढू शकत त्यामुळे आपण सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. IMD Weather Update

तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसामुळे उकड्यापासून थोडासा दिलासा मिळेल. धरणांमध्ये जलसाठा साठण्याची शक्यता आहे. तर नाशिक, जळगाव, धुळे येथे देखील मुसळधार पावसाची शक्‍यता नाही. परंतु हलक्या सरी पडू शकतात. अशाच हवामान अपडेट साठी आम्हाला फॉलो करा.

(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आणि हवामान खात्याच्या अपडेट नुसार आहे.)

अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “हवामान खात्याचा मोठा इशारा; पुढील 24 तासात या जिल्ह्यात होणार तुफान पाऊस”

Leave a Comment

error: Content is protected !!