Indian Top Five Cars : भारतीय ऑटोमोबाईल बाजाराचा चेहरा मोहरा गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे बदललेला आहे. कधीकाळी हॅचबॅक आणि सेडान गाड्या मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा भाग असायचा, पण आता परिस्थिती वेगळी आहे. कारण छोट्या गाड्यांना मागे टाकत SUV गाड्यांनी लोकांच्या मनात घर केल आहे. उंच, आकर्षक लुक, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि मजबूत बॉडी या गुणांमुळे लोक SUV झुकलेले दिसतात. शहर असो खेड, आता SUV नाव घेतलं की लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. Indian Top Five Cars
गेल्या काही महिन्यांचे विक्री आकडे बघितले तर स्पष्ट होतं की आता SUV गाड्यांच राज्य आला आहे. कार प्रेमींना आता छोट्या गाड्यांपेक्षा दमदार SUV जास्त आवडत आहे. कारण कुटुंबांबरोबर दूर प्रवास करायचा असेल, पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांवरून गाडी सहज न्यावी लागते किंवा शेतात डोंगरावर फिरायला जायचं असेल तर ही गाडी उत्तम ठरते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला या गाड्यांचे हजारोंच्या संख्येने विक्री होत आहे. त्याची पाच गाड्या बाजारात आघाडीवर आहेत आणि खरोखरच विक्रीच्या आकडेवारीत या गाड्यांचा धबधबा पाहायला मिळतो.
हे पण वाचा | पगार कमी आहे ? पण गाडी घ्यायची इच्छा आहे; तर ही कंपनी तुमचं स्वप्न पूर्ण करणार वाचा सविस्तर माहिती
सर्वात पहिल्यांदा हुंडाई क्रेटाच. जुलै 2025 मध्ये या गाडीची तब्बल 16898 युनिट्स विकली गेली. ही हुंडाईची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. खरंतर मागच्या वर्षाच्या तुलनेत विक्री थोडीशी कमी असली तरी क्रेटाच वेड अजूनही कायम आहे.
दुसऱ्या नंबर वर येते ती मारुती ब्रेझा. भारतीय ग्राहकांचा मारुती वरील विश्वास पुन्हा अधोरेखित करणारी ही गाडी जुलै 2025 मध्ये 1465 युनिट विकली गेली. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 4% घट झाली आहे पण तरीही गावोगावी शहरा शहरांमध्ये ही गाडी आपली लोकप्रियता टिकून ठेवते.
तिसऱ्या स्थानावर आहे भारतीय चा लाडका ब्रँड महिंद्रा स्कार्पिओ. गेल्या दशक अनु दशक या गाडीची क्रेज पाहायला मिळत आहे. 2025 च्या जुलै महिन्यात स्कार्पिओ ची विक्री 13,747 युनिट्स पर्यंत गेली आहे, जी मागच्या वर्षापेक्षा तब्बल 12 टक्क्यांनी जास्त आहे. स्कार्पिओ N आणि स्कार्पिओ क्लासिक या दोन्हीही व्हर्जन मुळे लोकांची पसंती वाढली आहे. इतकच नाही तर स्कार्पिओ साठी एक ते तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे हे तिचं लोकप्रियतेच मोठा उदाहरण आहे.
चौथ्या स्थानावर आली आहे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स. ही गाडी अजून नवीन असली तरी ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचा आकडेवारी सांगते. जुलै 2025 मध्ये 12,872 युनिट्स विक्री झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गाडीने वार्षिक 18 टक्क्यांनी वाढ नोंदवली, जी सर्वाधिक आहे. म्हणजे लोक या कारकडे वळताना पाहिला मिळत आहे. Indian Top Five Cars
पाचवा नंबर वर आहे टाटा नेक्सन. ही गाडी भारतीय बाजारात नेहमीच लोकांची आवडती पसंत आहे. जुलै 2025 मध्ये टाटा नेक्सन ची 12,825 युनिट्स विक्री झाली आहे. मात्र, मागच्या वर्षाच्या तुलनेत विक्री 8 टक्क्यांनी घट झाली आहे. तरीही TATA ब्रँड वर विश्वास ठेवणारे ग्राहक ही गाडी खरेदी करायला प्राधान्य देत आहे.
जर तुम्ही देखील गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यापैकी एक गाडी तुम्ही खरेदी करू शकता कारण या कारची मागणी वाढत आहे त्यासोबत या गाडीचे फीचर्स देखील बेस्ट आहे. खरेदी करण्यापूर्वी गाडीची सविस्तर माहिती पहा.