Kanda Bajar Bhav: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसापासून राज्यातील कांदा बाजारपेठेत मंदी असल्याचे दिसत होते. मात्र आज 13 ऑगस्ट 2025 रोजी कांद्याच्या बाजार भावामध्ये थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत मनमाड दिंडोरी देवळा आणि इतर प्रमुख बाजारात मध्ये उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळाला आहे. काही ठिकाणी दर 2100 रुपयापर्यंत पोहोचला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा कांदा बाजार भाव.
लासलगाव बाजारात आज उन्हाळी कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणात झाली असून या ठिकाणी कमीत कमी दर 600 रुपये तर सरासरी दर 1525 रुपये मिळाला आहे. राज्यात एकूण एक लाख 23 हजार 523 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. एवढ्या मोठ्या अवखेनंतरही दर घसरले नसल्यामुळे बाजार भाव काही प्रमाणामध्ये सकारात्मक असल्याचे दिसत आहे. Kanda Bajar Bhav
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव
- येवला बाजार समितीमध्ये आज कांद्याला सरासरी 1475 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1251 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- मनमाड बाजारामध्ये कांद्याला 1510 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला 1650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- भुसावळ बाजार समितीमध्ये 1200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- दिंडोरी बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1711 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- देवळा बाजार समितीमध्ये कांद्याला 1550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
हे पण वाचा| तुरीची आवक घसरली! या बाजार समितीमध्ये मिळत आहे सर्वात जास्त दर; पहा आजचा बाजार भाव
काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाचा कांदा बाजारात आणल्यास दर 2100 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला आहे.
लाल कांद्याचे बाजार भाव
सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जळगाव बाजारात सरासरी दर 862 रुपये नागपूर मध्ये 1450 रुपये तर शिरपूर मध्ये 1125 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. लाल कांद्याचा दरामध्ये स्थिरता असली तरी आवक कमी असल्यामुळे काही ठिकाणी या कांद्याला दर वाढून मिळाला आहे.
पुणे बाजारात स्थानिक कांद्याला सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर पिंपरी बाजारात 1500 रुपये दर मिळाला आहे. सांगली कोल्हापूर सातारा कराड या भागातही कांद्याचे दर चांगले असल्यामुळे व्यापाऱ्यांचा उत्साह वाढल्याचा पाहायला मिळत आहे. मुंबई कांदा बटाटा बाजार समितीमध्ये सरासरी 1550 रुपये दर मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
कांद्याचे दर गेल्या काही आठवड्यापासून घसरत होते मात्र सध्या बाजारात मिळणारे दर पाहता किमान खर्च निघेल एवढी किंमत शेतकऱ्यांना मिळू शकते. तरीही वाढत्या अवकेमुळे आणि साठवणुकीच्या अडचणीमुळे दर पुन्हा खाली जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर भाव टिकून राहण्यासाठी शासनाने हमीभाव जाहीर करावा अशी मागणी देखील करत आहेत.
आजच्या राज्यातील कांदा बाजारभावाने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा दिला असला तरी ही सुधारणा कायम राहील का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. पावसाळ्यातील वातावरण, साठवणुकीसाठी सुविधा आणि बाजारातील मागणी पुरवठा यावर पुढील काही दिवसात दर अवलंबून राहतील. मात्र आज मिळालेल्या दरामुळे शेतकरी आणि व्यापारी दोन्हीही समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.